Paavo Nurmi Games 2024 : पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी नीरज चोप्राने दाखवली ताकद, पावो नूरमी गेम्समध्ये जिंकलं सुवर्णपदक…

Paavo Nurmi Games 2024 :- भारताचा गोल्डनबॉय भालाफेकपटू नीरज चोप्राने इतिहास रचला आहे. पावो नूरमी गेम्स २०२४ मध्ये त्याने गोल्डमेडलवर आपले नाव कोरले. पहिल्यांदाच नीरज चोप्रा या खेळात सुवर्णपदक जिंकला आहे. २०२३ मध्ये नीरज या स्पर्धेत भाग घेऊ शकला नव्हता. तर २०२२ मध्ये त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते.
NEERAJ CHOPRA GRABS THE GOLD 🤩🥇
Neeraj with best throw of 85.97m is his 3rd Attempt won GOLD Medal 🥇at Paavo Nurmi Games 2024 #NeerajChopra #Paris2024 https://t.co/xIBZQr6qBQ pic.twitter.com/ZzTFHQnQVP
— The Khel India (@TheKhelIndia) June 18, 2024
मंगळवारी फिनलँड या ठिकाणी उशिरा झालेल्या पावो नूरमी गेम्स स्पर्धेत (१८ जून) नीरज चोप्राने ८५.९७ मीटर दूर भाला फेकत सुवर्ण पदक जिंकले आहे. चोप्राने टोकियो ऑलिंपिक च्या दरम्यान भाला फेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला होता.
आता २६ जुलै २०२४ पासून पॅरीसमध्ये ऑलिंपिक स्पर्धा सुरु होते आहे. अशात पावो नूरमी गेम्समध्ये नीरजने केलेली कामगिरी ही त्याच्या चाहत्यांसाठी आणि भारतासाठी नक्कीच आनंदाची बातमी आहे. नीरजच्या नंतर त्याचा प्रतिस्पर्धी टोनी केरानेनने ८४.१९ मीटरच्या फेकीसह रौप्यपदक तर ओलिवयर हेलांडरने ८३.९६ मीटर अंतरावर भाला फेकत त्याला कांस्य पदक पटकाविले.





