नवी दिल्ली: दिल्ली उच्च न्यायालयाने झटका दिल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहेत. आयएनएक्स मीडिया प्रकरणात न्यायालयाने त्यांना दिलासा न देता अटकपूर्व जामिनासाठी केलेल्या त्यांच्या दोन्ही याचिका फेटाळल्या आहेत. याचिका फेटाळल्यानंतर आता पी. चिदंबरम यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
सीबीआयने 15 मे 2017 रोजी चिदंबरम यांच्याविरोधात “एफआयआर’ दाखल केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री असताना 2007 साली चिदंबरम यांनी 305 कोटी रुपये घेऊन एका माध्यम समुहाला “एफआयपीबी’ची मंजूरी दिल्याचा त्यंच्यावर आरोप आहे. सक्तवसुली संचलनालयानेही या संदर्भात मनी लॉंडरिंगचे प्रकरण दाखल करून घेतले आहे.