चिदंबरम यांनी पहलगामच्या दहशतवाद्यांना म्हटले ‘Home Grown’ ; भाजपचा संताप, म्हणाले,”त्यांचा सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास”

P. Chidambaram On Pahalgam। पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी केलेल्या एका विधानावर भाजपने संताप व्यक्त केला आहे. चिदंबरम यांनी पहलगामच्या दहशतवाद्यांना म्हटले ‘Home Grown ‘असूशकते असे म्हटले होते. त्यांच्या याच विधानावर आता केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या शोभा करंदलाजे यांनी माजी गृहमंत्री चिदंबरम यांच्यावर निशाणा साधला आहे. चिदंबरम यांच्यावर टीका करताना त्यांनी, “चिदंबरम सतत पाकिस्तानचा बचाव का करत आहेत? काँग्रेस नेहमीच स्वतःच्या सुरक्षा संस्थांवर प्रश्नचिन्ह का उपस्थित करते, तर जगातील सर्वात मोठ्या दहशतवाद निर्यात करणाऱ्या देशावर कधीच प्रश्न का उपस्थित केले जात नाहीत? असे सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केले.
भाजपने विधानावर प्रश्न उपस्थित केले P. Chidambaram On Pahalgam।
शोभा करंदलाजे यांनी आजच्या अधिवेशनाच्या अगोदरच चिदम्बरम यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. त्यांनी याविषयी बोलताना,”पाकिस्तानचा भारतात दहशतवाद्यांना घुसवण्याचा दीर्घ आणि रक्तरंजित इतिहास आहे. हे पहिल्यांदाच घडलेले नाही, तरीही काँग्रेसने अशा घृणास्पद कृत्यांना वारंवार कमी लेखले आहे.” असे म्हणत त्यांच्यावर टीका केली. त्यांनी विचारले की चिदंबरम त्यांच्या विधानातून कोणता संदेश देऊ इच्छित आहेत? त्यांनी विचारले की तुम्हाला भारताच्या शूर सैन्यापेक्षा आयएसआयवर जास्त विश्वास आहे का आणि राष्ट्रीय हितापेक्षा राजकीय द्वेष महत्त्वाचा आहे का?’ केंद्रीय मंत्री करंदलाजे यांनी,”काँग्रेसच्या डीएनएमध्ये काही गंभीर त्रुटी आहेत, जी नेहमीच भारतावर संशय घेते आणि आपल्या लोकांवर हल्ला करणाऱ्यांबद्दल नेहमीच मवाळ दृष्टिकोन स्वीकारते.” असेही म्हटले.
नेमकं काय म्हणाले होते चिदंबरम ? P. Chidambaram On Pahalgam।
चिदंबरम यांनी अलीकडेच पहलगाम हल्ल्याबद्दल एका संकेतस्थळाका मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्यांनी,” सरकार गेल्या काही आठवड्यात एनआयएने काय केले आहे हे सांगण्यास तयार नाही. त्यांनी दहशतवाद्यांना ओळखले आहे का? ते कुठून आले? कोणाला माहित आहे की ते देशातच तयार केलेले घरगुती दहशतवादी असू शकतात. ते पाकिस्तानातून आले आहेत असे तुम्ही का गृहीत धरले? याचा कोणताही पुरावा नाही. भारताचे झालेले नुकसानही सरकार लपवत आहे.” असे म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली होती.
माजी गृहमंत्री चिदंबरम यांनी आरोप केला की, “सरकारने देशाला विश्वासात घेतले नाही. पंतप्रधानांनी सांगितले होते की ऑपरेशन फक्त थांबवण्यात आले आहे, संपवले नाही. जर तसे असेल, तर त्यानंतर सरकारने कोणती पावले उचलली आहेत? पहलगामसारखा दुसरा हल्ला रोखण्यासाठी मोदी सरकारने काही ठोस पावले उचलली आहेत का?” याविषयीची माहिती जनतेला का दिली नाही ? असे काही थेट सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केले.
चिदंबरम यांनी सरकारला ,”हल्ला करणारे दहशतवादी कुठे आहेत? तुम्ही त्यांना का पकडले नाही, आतापर्यंत त्यांची ओळख का ओळखली नाही? हल्लेखोरांना आश्रय देणाऱ्या काही लोकांना अटक केल्याची बातमी आली होती. त्यांचे काय झाले? असे अनेक प्रश्न आहेत, पण सरकार त्यांना का टाळत आहे? पंतप्रधान मोदी याबद्दल का बोलत नाहीत?” असे तिखट प्रश्न करत त्यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता.





