P. Chidambaram : ब्रिक्समधून कोणतेही ठोस फायदे नाहीत; काॅंग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी उपस्थित केले प्रश्नचिन्ह
P. Chidambaram : भारत नवी दिल्लीत २०२६ च्या ब्रिक्स शिखर परिषदेचे आयोजन करणार आहे. पण गेल्या दोन-तीन ब्रिक्स शिखर परिषदांमधून भारताला कोणताही ठोस फायदा किंवा परिणाम साध्य झालेला नाही.

P. Chidambaram : भारत नवी दिल्लीत २०२६ च्या ब्रिक्स शिखर परिषदेचे आयोजन करणार आहे. पण गेल्या दोन-तीन ब्रिक्स शिखर परिषदांमधून भारताला कोणताही ठोस फायदा (P. Chidambaram) किंवा परिणाम साध्य झालेला नाही. भारत शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन, जी-२० आणि क्वाड यांसारख्या अनेक प्रमुख आंतरराष्ट्रीय गटांचा सदस्य आहे.
त्यामुळे, या गटांमध्ये सामील झाल्यामुळे देशाला नेमके कोणते फायदे मिळत आहेत, हे स्पष्ट व्हायला हवे, असे प्रतिपादन माजी केंद्रिय अर्थमंत्रीआणि विद्यमान राज्यसभा सदस्य पी. चिदंबरम (P. Chidambaram) यांनी केले आहे. या वर्षी भारत ब्रिक्सचे अध्यक्षपद भूषवत असून, १८ वी ब्रिक्स शिखर परिषद १२ आणि १३ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित केली जाईल.
या शिखर परिषदेत ब्रिक्स सदस्य देशांचे तसेच भागीदार देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील. भारताने या वर्षीच्या ब्रिक्स अध्यक्षपदासाठी (P. Chidambaram) लवचिकता, नवोपक्रम, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी ही संकल्पना निश्चित केली आहे. भारताने लोकांना केंद्रस्थानी ठेवण्यावर आणि मानवतेला प्राधान्य देण्यावर भर दिला आहे.






