Ozar News : स्व.निवृत्तीशेठ शेरकर यांचे सारखे आदर्श सरपंच निर्माण होणे काळाची गरज आहे.- भास्करराव पेरे पाटील
समाजाची सेवा करत असताना स्व. निवृत्तीशेठ शेरकर यांनी जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील लोकांसाठी श्री विघ्नहर साखर कारखान्याची उभारणी (Ozar News) करुन दोन्ही तालुक्यातील शेतकरी वर्गाचे आर्थिक जिवनमान उंचावण्याचे मोठे कार्य केले आहे.

Ozar News : समाजाची सेवा करत असताना स्व. निवृत्तीशेठ शेरकर यांनी जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील लोकांसाठी श्री विघ्नहर साखर कारखान्याची उभारणी (Ozar News) करुन दोन्ही तालुक्यातील शेतकरी वर्गाचे आर्थिक जिवनमान उंचावण्याचे मोठे कार्य केले आहे.
त्यांच्या पावलावर पाउल ठेऊन आपण चालला आहात. त्याबद्दल तुमचे कौतुक (Ozar News) करावे तेवढे थोडे आहे. तसेच स्व.निवृत्तीशेठ शेरकर यांना त्यांच्या पत्नी हिराबाई शेरकर यांनी खंबीरसाथ दिली.
स्व.निवृत्तीशेठ शेरकर यांनी स्थापन केलेल्या विघ्नहर सहकारी कारखान्याचा कारभार विद्यमान चेअरमन सत्यशिल शेरकर हे अगदी पारदर्शकपणे सांभाळत आहे. शेठबाबा यांनी दिलेल्या दिशेने तुम्ही चालला आहांत.
त्याच प्रमाणे त्यांचे नावाच निवृत्ती असल्याने ते नावाप्रमाणे निस्वार्थी होते स्व. निवृत्तीशेठ यांच्या सारखी निस्वार्थी व धेयवेडी माणसे यापुढील काळात होणार नाहीत. असे गौरोद्गार भास्करराव पेरे पाटील यांनी काढले.
जुन्नर तालुक्याचे भाग्यविधाते व श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार स्व. निवृत्तीशेठ शेरकर यांचे १९ वे व त्यांच्या पत्नी स्व. हिराबाई शेरकर यांच्या १७ वे पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित अभिवादन सभेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
पुढे त्यांनी गावच्या सरपंचांना किती अधिकार असतात आणि गावचा सरपंच कोणकोणती कामे करु शकतो याबाबत सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. तसेच पर्यावरण संतुलनासाठी गावात (Ozar News) मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करावी, गाव स्वच्छ ठेवावे, गावातील वडीलधाऱ्या माणसांना सन्मानाने वागवावे, मुलांना चांगले शिक्षण आणि संस्कार द्यावेत.
त्याच प्रमाणे त्यांनी स्वताच्या गावामध्ये त्यांच्या सरपंचपदाच्या काळात फिल्टर पाणी, मोफत दळण, मोफत गरमपाणी, गावात वायफाय इ. सुविधामोफत व सवलतीचे दरात ग्रमापंचायत मार्फत शेती मशगतीसाठी गावकऱ्यांना ट्रॅक्टर उपलब्ध करुन दिलेले आहेत. त्याप्रमाणे इतरही सरपंचांनी आपआपल्या गावात अशा सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. असे अवाहन याप्रसंगी त्यांनी केले.
यावेळी शरददादा सोनवणे, आमदार, व्हाईस चेअरमन अशोक घोलप, संजय काळे,नंदुकाका शेरकर, आशाताई बुचके, सुमित्राताई शेरकर, अनिलतात्या मेहर, तान्हाजीशेठ बेनके, अनंतराव चौगुले, अंकुश आमले, माऊलीशेठ खंडागळे, पांडुरंग पवार, रघुनाथ लेंडे, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आदी मान्यवरांसह श्री विघ्नहर कारखान्याचे सर्व आजी-माजी संचालक विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, शिरोली पंचक्रोशीतील ग्रामस्थ, विविध गांवांचे सरपंच, उपसरपंच, अनेक संस्थांचे चेअरमन /संचालक, सत्यशिल शेरकर यांचा मित्र परिवार, कारखान्याचे सर्व अधिकारी आणि कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार शेरकर कुटूंबीयांच्या वतीने करण्यात आला.
प्रास्ताविक करताना चेअरमन सत्यशिल शेरकर म्हणाले की, स्व. शेठबाबांची स्मृती कायम स्मरणात रहावी या उद्देशाने दरवर्षी पुण्यस्मरण कार्यक्रमांचे आयोजन केले जात असून दरवर्षी मोठ्या संख्येने उपस्थित रहात असलेल्या सर्वांचे स्वागत केले. सत्यशिल शेरकर पुढे म्हणाले की, स्व.शेठबाबांनी घालून दिलेल्या आदर्श नुसार विघ्नहरचा कारभार पारदर्शकपणे केला जात असून शेतकरी हिताचे निर्णय घेतले जात आहेत.
याप्रसंगी संजय काळे, आशा बुचके, आमदार शरद सोनवणे आर्दीनी शेठ बाबांच्या आठवणींना उजाळा देऊन त्यांना आदरांजली वाहिली.प्रारंभी उपस्थित भास्करराव पेरे पाटील यांचे हस्ते स्व. निवृत्तीशेठ शेरकर व स्व. हिराबाई शेरकर यांच्या प्रतिमांचे पुजन करण्यात आले. कार्यकारी संचालक भास्कर घुले यांनी पाहुण्यांची ओळख करुन दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन लक्ष्मण शेरकर यांनी केले. तर आभार व्हाईस चेअरमन अशोक घोलप यांनी मानले.






