Ozar News : संकष्टी चतुर्थी दिनी दीड लाख भाविकांनी घेतले श्री विघ्नहराचे दर्शन
अष्टविनायकांतील मुख्य स्थान असलेल्या श्री क्षेत्र ओझर (Ozar News) येथे संकष्टी चतुर्थी दिनी दीड लाख भाविकांनी श्री विघ्नहराचे दर्शनाचा लाभ घेतला.

Ozar News : अष्टविनायकांतील मुख्य स्थान असलेल्या श्री क्षेत्र ओझर (Ozar News) येथे संकष्टी चतुर्थी दिनी दीड लाख भाविकांनी श्री विघ्नहराचे दर्शनाचा लाभ घेतला. पहाटे ५ वाजता श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष बाळकृष्ण कवडे,उपाध्यक्ष तुषार कवडे,सचिव सुनील घेगडे,खजिनदार दत्तात्रय कवडे विश्वस्त सुर्यकांत रवळे,प्रकाश मांडे,विक्रम कवडे विनायक मांडे,समीर मांडे, संतोष कवडे,विलास कवडे,शिल्पाताई जगदाळे यांच्या शुभहस्ते श्रींना महाअभिषेक पूजा करून दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले.
मंदिरामध्ये चतुर्थीच्या (Ozar News) शुभमुहूर्त असल्याने महाआरती करण्यात आली. महाआरतीचा मान वसंत सोनू कवडे,जज्ज अनंत बजाड,मयूर पानसरे,प्रशांत पाटील,प्रसाद विश्वासराव,संदेश पंतोजी,डॉ.विक्रांत पाटील यांना मिळाला. त्यांचे आभार श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष बाळासाहेब कवडे यांनी मानले.
पहाटे पाच ते अकरा वाजे पर्यंत रांगेत सुमारे दीड लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. सकाळी ७.०० वा. व दुपारी १२.०० वा. मध्यान्ह आरती करण्यात आली. सकाळी ८.०० वा. नियमित पोथी वाचन करण्यात आले.सकाळी १०.३० वा.’’श्री” स नैवद्य दाखवून भाविकांना खिचडी वाटप श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट च्या वतीने करण्यात आली.
आज संकष्टी चतुर्थी निमित्ताने विघ्नहर मंदिरात पेरू या फळाची आरस शिवाजी व विजय मुळे यांसकडून करण्यात आली. तसेच देवस्थान ट्रस्ट च्या वतीने फुलांची आरस विघ्नहराला रेशमी जरीचा पोशाख करण्यात आला होता. तसेच सोन्याचे अलंकार श्री विघ्नहराला परिधान करण्यात आले. व येणाऱ्या भाविकांसाठी मंदिरात दर्शनरांग,पाणी पिण्याचे व्यवस्था,अभिषेक व्यवस्था, देणगी कक्ष ,अभिषेक करण्यासाठी शमी वृक्षाखाली व्यवस्था,चप्पल stand पार्किंग, कमीत कमी वेळेतील दर्शनासाठी मुखदर्शन व्यवस्था इत्यादी व्यवस्था करण्यात आली.
तसेच पार्किंग तळावरील १०० बाय २०० चे पत्राशेडचा भाविकांनी उपयोग करून घेतला .सायंकाळी ७.०० वा. नियमित हरिपाठ करण्यात आले. व चंद्रोदयापर्यंत कीर्तनकार ह.भ.प.शिंदेताई महाराज,ओतूर यांचे हरिकीर्तन झाले. त्यांना साथसंगत श्रीराम प्रसादिक भजनी मंडळ शिरोली यांनी दिली.
आजचे अन्नदाते विश्वस्त प्रवीण जालिंदर वाळूंज ,ओझर यांनी चतुर्थीचे वारकरी अन्नदान केले. रात्री १०.३० वाजता शेजआरती करून ११.०० वाजता मंदिर बंद करण्यात आले. आजच्या महाआरतीच्या मानकरी यांनी विकास कामात सहभागी होवून ट्रस्ट ला देणगी दिली. गर्दीचे नियोजन देवस्थान ट्रस्ट चे व्यवस्थापक व कर्मचारी (Ozar News) यांनी केले.






