‘झूठ, झूठ और झूठ…’ म्हणत ओवैसींचे मोदींवर टीकास्त्र
Updated On:

नवी दिल्ली – देशात करोनाची सध्या जी दुसरी मोठी लाट आली आहे त्याला मोदीच जबबादार असल्याची टीका त्यांनी केली आहे. आज देशात अत्यंत संथ गतीने लसीकरणाचे काम सुरू आहे. देशात आत्तापर्यंत केवळ तीन टक्केच लसीकरण झाले आहे.
ही गती अशीच राहिली तर देशात कोविडच्या अनेक लाटा येऊ शकतात. लसीकरणाचा संथ गतीवरून सध्या मोदी सरकारवर विरोधी पक्षांकडून चांगलीच टीका केली जात आहे. आता यावरूनच एआयएमआयएमी चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे.
ओवैसी यांनी ट्विट करत, ‘खोटे, खोटे आणि खोटे मोदी सरकार खोटेपणावर सत्तेत आहे. पंतप्रधानांनी त्यांचा स्वप्नांतून बाहेर निघावे. तुमच्या महालातून बाहेर येऊन बघा देशातील गरीब जनतेचे काय हाल होत आहेत’ असं म्हणत पंतप्रधानांवर निशाणा साधला.






