“हा निर्णय न्यायाची थट्टा…” ; मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालावर ओवेसी संतापले, सरकारला केले गंभीर सवाल

Owaisi on Malegaon bomb blast। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आज एनआयएच्या विशेष न्यायालयाने मोठा निकाल दिला. २००८ च्या बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व सात आरोपींना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले. यामध्ये भाजपच्या माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांचा समावेश आहे. दरम्यान, एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी या प्रकरणासंदर्भात संताप व्यक्त केला आहे.
असदुद्दीन ओवेसी यांनी सोशलमिडीयावर एक पोस्ट करत या निर्णयाला न्यायाची थट्टा असल्याचे म्हटले आहे. तसेच अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये “२००६ च्या मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष सुटलेल्या १२ आरोपींविरुद्ध मोदी आणि फडणवीस सरकार या निर्णयाविरुद्ध अपील करतील का? महाराष्ट्रातील धर्मनिरपेक्ष पक्ष या प्रकरणात जबाबदारीची मागणी करतील का? सर्वात मोठा प्रश्न म्हणजे त्या सहा निष्पाप लोकांना कोणी मारले?”
ओवेसींनी रोहिणी सालियनचा उल्लेख का केला? Owaisi on Malegaon bomb blast।
ओवेसी यांनी २०१६ मध्ये तत्कालीन विशेष सरकारी वकील रोहिणी सालियन यांच्या विधानाचा संदर्भ दिला, ज्यामध्ये त्यांनी खुलासा केला होता की एनआयएने त्यांना आरोपींविरुद्ध मवाळ भूमिका घेण्यास सांगितले होते. त्यांनी लिहिले, ”२०१७ मध्ये एनआयएने साध्वी प्रज्ञा यांना निर्दोष सोडण्याचा प्रयत्न केला, ज्या नंतर २०१९ मध्ये भाजपच्या खासदार झाल्या.
1. The Malegaon blast case verdict is disappointing. Six namazis were killed in the blast and nearly 100 were injured. They were targeted for their religion. A deliberately shoddy investigation/prosecution is responsible for the acquittal.
2. 17 years after the blast, the Court…— Asaduddin Owaisi (@asadowaisi) July 31, 2025
ओवैसींकडून तपास यंत्रणांवरही प्रश्न उपस्थित Owaisi on Malegaon bomb blast।
ओवेसी यांनी तपास यंत्रणा, एनआयए आणि एटीएस यांच्या निष्काळजीपणा आणि संशयास्पद भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, ”हे मोदी सरकारचा खरा चेहरा दाखवते, जे दहशतवादावर कठोर असल्याचा दावा करते, ज्यामुळे दहशतवादी प्रकरणातील आरोपीला खासदार बनवले. दोषी तपास अधिकाऱ्यांना जबाबदार धरायचे का?”
ओवैसी म्हणतात की सर्वांना उत्तर माहित आहे. हे प्रकरण केवळ तपास प्रक्रियेतील त्रुटी अधोरेखित करत नाही तर भारतातील धार्मिक हिंसाचाराच्या बळींना कधी न्याय मिळेल का ?असा प्रश्न देखील उपस्थित करते. मालेगावचे पीडित अजूनही उत्तरांची वाट पाहत आहेत.” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.





