Suraj Chavan : आनंद गगनात मावेना! सूरज चव्हाण झाला बाबा; रुग्णालयातील व्हिडिओ आला समोर
Suraj Chavan : रुग्णालयातील त्याचा पहिला व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला असून, त्यात बाळाची पहिली झलक पाहायला मिळत आहे. सूरजच्या एका चाहत्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

Suraj Chavan : बिग बॉस मराठी’चा विजेता सूरज चव्हाण बाबा झाला आहे. डिसेंबर महिन्यात संजना हिच्यासोबत विवाहबद्ध झालेल्या सूरजच्या घरी लग्नाच्या नऊ महिन्यांनी चिमुकल्या लक्ष्मीचे आगमन झाले आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सूरज आणि संजना यांना कन्यारत्न प्राप्त झाले. (Suraj Chavan)
बाबा झाल्यानंतर सूरजचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. रुग्णालयातील त्याचा पहिला व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला असून, त्यात बाळाची पहिली झलक पाहायला मिळत आहे. सूरजच्या एका चाहत्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे. (Suraj Chavan)
View this post on Instagram
या व्हिडिओमध्ये सूरज आणि संजना यांच्या बाळाला पाहण्यासाठी रुग्णालयातील स्टाफ तसेच चाहत्यांनी गर्दी केल्याचे दिसत आहे. गर्दीतून सूरज संजना आणि आपल्या चिमुकलीला भेटताना दिसतो. या हृदयस्पर्शी क्षणांवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव करत सूरज आणि संजना यांचे अभिनंदन केले आहे. (Suraj Chavan)
सूरज चव्हाणने ‘बिग बॉस मराठी’ची ट्रॉफी जिंकल्यानंतर त्याच्यावर अवघ्या महाराष्ट्रातून शुभेच्छांचा वर्षाव झाला होता. त्यानंतर त्याचे त्याच्या मामाची मुलगी संजना हिच्यासोबत लग्न ठरले. डिसेंबर महिन्यात दोघांचा मोठ्या थाटामाटात विवाह पार पडला. (Suraj Chavan)
या विवाहाची त्यावेळी चांगलीच चर्चा झाली होती. लग्नाआधी सूरजने स्वतःचे घर बांधले होते. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्याला यासाठी मदत केली होती. लग्नानंतर सूरज आणि संजना आपल्या नव्या घरी राहायला गेले. (Suraj Chavan)
आता याच घरात चिमुकल्या लक्ष्मीचे आगमन झाल्याने दोन्ही कुटुंबांत आनंदाचे वातावरण आहे. सूरज आणि संजना यांच्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
DJ No entry: तळेगावातील गणेशोत्सवात डीजेला नो एंट्री; मोठ्या आवाजाच्या वाद्यांना परवानगी नाही





