Oscar Trophy : ऑस्कर पुरस्काराकडे कलाविश्व आणि चित्रपट दुनियेमध्ये सर्वात प्रतिष्ठेचा सोहळा म्हणून याकडे पाहिलं जात. चित्रपटातील दिग्गजांपासून ते अगदी बालकलाकारांपर्यंत सर्वांच्याच मनात या पुरस्कारासाठी एक विशेष स्थान असते. ऑस्करची ती सोनेरी बाहुली आपल्या देखील हातात असावी याकरता प्रत्येक कलाकार प्रयत्नशील असतो.
पहिला अकादमी पुरस्कार सादरीकरण 16 मे 1929 रोजी हॉलिवूड मधील रुझवेल्ट हॉटेलमध्ये सुमारे 270 लोकांच्या प्रेक्षकांसह खाजगी डिनर कार्यक्रमात आयोजित करण्यात आला होता. यावेळी, ‘एमिल जिनिंग’ हे पहिले व्यक्ती आहेत ज्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर दिला होता.
तर, 1963 मध्ये ‘सिडनी पॉटियर’ हा पहिला कृष्णवर्णीय अभिनेता होता ज्याने ऑस्कर पुरस्कारावर आपले नावं कोरले. दरम्यान, आर एस ओवेंस आणि कंपनी 1982 पासून शिकागोमध्ये ऑस्कर पुतळे तयार करत असून, हा पुरस्कार 34cm उंच आणि 8.5 औंध पौंड वजनाचा असतो.
मात्र, आता ऑस्करसारखी हुबेहूब जिसणारी ट्रॉफी ‘फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन’ साइटवरही उपलब्ध झालीये. या दोन्ही ई-कॉमर्स साइट्सवर ऑस्कर ट्रॉफी नावाने सर्च केल्यास ऑस्करसारखी दिसणारी ट्रॉफी समोर येते ही ऑस्कर ट्रॉफी अॅमेझॉनवर 263 ते 700 रुपयांना उपलब्ध आहे.
तर ही ट्रॉफी फ्लिपकार्टवर फक्त 353 रुपयांना आहे. दोन्ही प्लॅटफॉर्मवर ट्रॉफीची रचना सारखीच आहे. या दोन्ही ई-कॉमर्स साइट्सवर ऑस्कर ट्रॉफी नावाने सर्च केल्यास ऑस्करसारखी दिसणारी ट्रॉफी तुमच्या समोर येते. यासोबत कलाविश्वातिल इतर प्रसिद्ध (मानाचे) पुरस्कार देखील या ई-कॉमर्स साइट्सवर उपलब्ध दिसून येते.