Oscar Awards 2026: प्रियांका चोप्राचा पती निक जोनाससोबत ऑस्करच्या रेड कार्पेटवर जलवा
Oscar Awards 2026: ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात 'सिनर्स' या चित्रपटाला सर्वाधिक १६ नामांकने मिळाली.

Oscar Awards 2026: अभिनेत्री प्रियांका चोप्रा ९८ व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात (ऑस्कर २०२६) सहभागी झाली होती. प्रियांकाने पती निक जोनाससह या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये ऑस्कर पुरस्कार सोहळा रंगला.Oscar Awards 2026
विशेष म्हणजे, यंदा प्रियांका चोप्राची ऑस्करमध्ये पुरस्कार प्रदान करणाऱ्या सादरीकरणकर्त्यांच्या (Presenters) यादीत निवड झाली आहे. रेड कार्पेटवरील तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. Oscar Awards 2026
ऑस्कर पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर प्रियांका चोप्रा आणि निक जोनासचा खास अंदाज पाहायला मिळाला. प्रियांकाने पांढऱ्या रंगाच्या गाऊनमध्ये या सोहळ्याला हजेरी लावली होती.
तिच्या खास अंदाजाने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. तर निक जोनास काळ्या रंगाच्या ब्लेझरमध्ये जेन्टलमॅन दिसत होता. प्रियांका आणि निक जोनासने रेड कार्पेटवर कॅमेऱ्यासाठी खास पोझही दिल्या.
Nick Jonas and Priyanka Chopra Jonas pose together at the #Oscars. pic.twitter.com/ToApeukQqs
— Variety (@Variety) March 15, 2026
यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ‘सिनर्स’ या चित्रपटाला सर्वाधिक म्हणजे तब्बल १६ नामांकने मिळाली आहेत. या सिनेमाने ‘ला ला लँड’ आणि ‘टायटॅनिक’ या सिनेमांच्या नामांकनाचा विक्रम मोडला आहे.
प्रियांका चोप्राचे आगामी प्रोजेक्ट्स
प्रियांकाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती लवकरच एस.एस. राजामौली यांच्या ‘वाराणसी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ती प्रदीर्घ काळानंतर भारतीय चित्रपटसृष्टीत पुनरागमन करत आहे.
या चित्रपटात तिच्यासोबत साऊथ सुपरस्टार महेश बाबू आणि पृथ्वीराज सुकुमारन हेदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. Oscar Awards 2026
हेही वाचा :






