Santosh Deshmukh Case | बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राज्यभरात संतापाची लाट उमटली आहे. या प्रकरणातील आठ आरोपींना अटक करण्यात आले आहे. या प्रकरणातील सात आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे. या हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड असलेल्या वाल्मिक कराडवरही मकोका लावण्यात आला आहे. तर, जवळपास 65 दिवसानंतरही कृष्णा आंधळे फरार आहे. यातच आता फरार असलेल्या कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी हत्या झाली होती. तेव्हापासून कृष्णा आंधळे फरार असून त्याची संपत्ती जप्त करण्याची परवानगी द्यावी असा अर्ज सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाकडे केला आणि याबाबतची माहिती देखील सादर केली होती. या अर्जावर बीड कोर्टाने आज आदेश दिले आहेत.
यामध्ये कृष्ण आंधळे याच्याकडे पाच विविध प्रकारची वाहने असून धारूर व केज येथील बँकेत तीन खाते आहेत. त्यानुसार सदरची संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. याप्रकरणी कारवाई सुरू करण्यात आली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. Santosh Deshmukh Case |
या प्रकरणी मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, विष्णू चाटे, प्रतीक घुले, महेश केदार यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर मकोकाही लावण्यात आला. पण कृष्णा आंधळेचा अनेक ठिकाणी शोध घेऊनही तो अजून सापडलेला नाही. त्याच्यावरही मकोका लावण्यात आला. त्याला फरार घोषित करण्यात आले. Santosh Deshmukh Case |
हेही वाचा: