Devendra Fadnavis : कर्जमाफीवरून विरोधकांकडून टीकेची झोड; फडणवीसांचे रोखठोक प्रत्युत्तर, दिली ‘ही’ महत्वाची माहिती
Devendra Fadnavis : शेतकऱ्यांना २ लाखपर्यंतची कर्जमाफी जाहीर करण्यात आल्यानंतर विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात असून, या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर देत महत्वाची माहिती दिली आहे.

Devendra Fadnavis : अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी २ लाखपर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर सरकारवर विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात आहे. महाविकास आघाडीने सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी अपुरी आणि दिशाभूल करणारी असल्याचा आरोप केला आहे. यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर देत कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार? याबाबतचे निकष स्पष्ट करून सांगितले आहेत.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा मी केली आहे. काही लोक वेगवेगळ्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. कोणी म्हणतं राष्ट्रीयकृत बँकेचं होणार नाही, जिल्हा बँकेची होणार नाही, कोणी म्हणतं सोसायटीची कर्जमाफी होणार नाही. आम्ही दोन लाखापर्यंत कुठलीही बँक असो, ज्यांना पीक कर्ज देण्याचा अधिकार आहे असे कोणीही दिलेलं पीक कर्ज आम्ही माफ करणार आहोत, असे विरोधकांना ठणकावून सांगत फडणवीसांनी कर्जमाफी विषयीचे निकष स्पष्ट केले. Devendra Fadnavis

Devendra Fadnavis
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, आमचा प्रयत्न आहे हा आहे की, कर्जमाफी शेतकऱ्याला द्यायची आहे, बँकेला नाही. शेतकऱ्याला फायदा होण्यासाठी आम्ही यावर काम करत आहोत. ३० जूनच्या आधी आम्ही कर्जमाफी करणार आहोत. आता समिती या सगळ्यावर काम करत आहे. जुन्या कुठल्याही कर्जमाफीपेक्षा चांगली ही कर्जमाफी असेल, असेही ते म्हणाले आहेत.
या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जाची माफी दिली जाणार आहे. जे शेतकरी नियमितपणे कर्जफेड करतात त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर आर्थिक लाभ देण्याची घोषणाही करण्यात आली आहे.
हेही वाचा : Akhilesh Yadav on Nitish Kumar: नितीश कुमार पंतप्रधानपदाचे दावेदार?; अखिलेश यादव नेमकं काय म्हणाले?





