Mallikarjun Kharge : दोन्ही सभागृहांत राज्यघटनेवर दोन दिवस चर्चा व्हावी; विरोधकांची मागणी
Updated On:

नवी दिल्ली : संसदेतील दोन्ही सभागृहांत राज्यघटनेवर दोन दिवस चर्चा व्हावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. त्या मागणीची पत्रं राज्यसभा अध्यक्ष आणि लोकसभेच्या सभापतींना पाठवण्यात आली आहेत. राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सांभाळणारे कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी संबंधित माहिती दिली.
संसदेत राज्यघटनेशी संबंधित चांगल्या बाबींवर चर्चा व्हायला हवी. तसेच, देशात सध्या घडत असलेल्या अयोग्य घटनांवरही चर्चा होणे गरजेचे आहे. त्यामुळे चर्चेची मागणी करणारी पत्रं मी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पाठवली आहेत.
त्यावर केंद्र सरकारच्या प्रतिसादाची प्रतीक्षा आम्ही करत आहोत, असे त्यांनी नमूद केले. संसदेत राज्यघटनेवर चर्चा झाल्यास देशात चांगला संदेश जाईल, असे विरोधकांचे म्हणणे आहे.





