लॉकडाऊनला विरोध करत प्रकाश आंबेडकरांनी मुख्यमंत्र्यांना केली ‘ही’ विनंती

मुंबई : राज्यातील कोरोनाची स्थिती वाईटाकडून अतिवाईटाकडे जात आहे. कोरोनाच्या विळख्यातून सुटण्यासाठी कडक निर्बंध लावावे लागणार आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सांगितले. मात्र राज्यात लॉकडाऊनला अनेकांनी कडाडून विरोध केला आहे. वंचित बहूजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी लॉकडाऊन न लावण्याची सरकारला विनंती केली आहे, लॉकडाऊन उपाय नाही.
प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीट करत म्हटले की, ‘लॉकडाऊन पुन्हा लावण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. यामुळे आर्थिक व्यवहार ठप्प होतात. याने सर्वसामान्य मध्यमवर्गीयांच्या पोटावर पाय येईल. लॉकडाऊनने कोरोना आटोक्यात येणार नाही. शिस्त पाळणे, फिजिकल अंतर पाळणे गरजेचे आहे. सरकारला आमची विनंती राहील की, लॉकडाऊन करू नये.
आपण मधल्या काळात गाफील झालो. आता कोरोनाशी लढताना आपण परिस्थितीत पाय घट्ट रोवून उभे राहुया. विरोधकांना विनंती करतो, की जनतेच्या आरोग्याशी खेळू नका. लॉकडाऊन जाहीर करत नाही, पण मी इशारा देत आहे. दृश्य स्वरुपातीव परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय लवकरच घेणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्र राज्य सरकार हे खंबीर आहे. आरोग्य सुविधांची कमतरता जाणवू देणार नाही. सर्वांच्या सहकार्याचीच मी अपेक्षा करतो. सणांवरही निर्बंध आणावे लागतील. नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा करत कोरोनाविरोधातील लढाई लढण्यासाठी सिद्ध व्हा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी देत राज्यात कठोर निर्बंध लागणार असा इशारा दिला आहे.





