Pimpri : जलतरण तलाव खासगीकरणास विरोध

पिंपरी : महापालिकेकडून व्यापारी उद्देशाने दहा जलतरण तलाव खासगी संस्थांना चालविण्यास देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही ठराविक ठेकेदारांना पोसण्यासाठी हा उद्योग करण्यात आला असून, त्याचा भुर्दंड सर्वसामान्य करदात्या नागरिकांच्या माथी पडणार आहे. मनमानी व हुकूमशाही पद्धतीने घेतलेला हा निर्णय त्वरित रद्द करण्यात यावा, अशी मागणी वुई टुगेदर फाउंडेशनने केली आहे.
सर्व तलावांचे संचालन आणि व्यवस्थापन महापालिकेने करावे, आदी मागण्यांसाठी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले आहे. शिष्टमंडळात अध्यक्ष सलीम सय्यद, सचिव जयंत कुलकर्णी, खजिनदार दिलीप चक्रे, सदस्य जाकीर सय्यद, इक्बाल आत्तार, रवींद्र काळे उपस्थित होते.
या निवेदनावर वुई टुगेदर फाउंडेशनचे संस्थापक सदस्य क्रांतिकुमार कडुलकर, सल्लागार मधुकर बच्चे, दिलीप पेटकर, धनंजय मांडके, मोहम्मद शेख, नीलेश आवारे, अर्जुन पाटोळे, राजीव सुभेदार, पांडुरंग खलाने, विलास रासकर, रवींद्र इंगळे, रणजित सोमवंशी, स्वाती पाठक, सोनाली मन्हास, वासंती काळे, मंगला डोळे, अतुल शेठ, श्वेता जहागीरदार, प्रमोद आढाव, डॉ. पार्श्वनाथ वेलापुरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.





