#T20WorldCup | पंतच्या जागी इशान किशनला संधी?
Updated On:

मुंबई – पाकिस्तानकडून पराभव झाल्यानंतर भारतीय संघात पुढील सामन्यांसाठी मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातील प्रमुख बदल म्हणजे यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याच्या जागी इशान किशन याला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
टी-20 विश्वकरंडक स्पर्धेतील सामन्यात भारताला पाकिस्तानकडून एकतर्फी पराभव स्वीकारावा लागला. विराट कोहली याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा पाकिस्तानने 10 गडी राखून पराभव केला. या पराभवामुळे भारतीय संघासमोरच्या अडचणी वाढल्या आहेत.
भारताचा पुढील सामना रविवारी 31 ऑक्टोबरला न्यूझीलंडशी होणार आहे. या सामन्यातही भारताचा पराभव झाला, तर स्पर्धेतून बाहेर पडण्याचा धोका आहे.
अशा परिस्थितीत संघाला पुढील सर्व सामन्यांत विजय मिळवणे गरजेचे आहे. या सामन्यात ऋषभ पंतची कामगिरी अत्यंत सुमार झाली होती.





