Satara | बहुचर्चित ‘सूड शकारंभ’मध्ये माणमधील कलाकारांना संधी

दहिव (प्रतिनिधी) – सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असलेला राजनील फिल्म प्रोडक्शनचा ‘सूड शकारंभ’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
यामध्ये माण तालुक्यातील विविध क्षेत्रातील कलाकारांना कामं करण्याची संधी मिळाली आहे. वावरहिरे गावचे सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट रंजित सूर्यवंशी यांनाही यावेळी संधी मिळाली.
राजनील फिल्म्स प्रोडक्शनच्या ‘सूड शकारंभ’ या मराठी चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. शोएब खतीब यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.या चित्रपटाचे चित्रीकरण सांगली, कोल्हापूर सातारा या जिल्ह्यातील विविध भागात झालेले आहे. या जिल्ह्यातील स्थानिक कलाकारांना संधी देण्यात आली आहे.
येत्या दोन महिन्यात ‘सूड शकारंभ ‘हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आता चाहत्यांना या सिनेमाची उत्सुकता लागून राहिली आहे. हा सिनेमा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असे ‘सूड शकारंभ ‘या चित्रपटाच्या निर्मात्याकडून सांगण्यात आलेले आहे.





