Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरच्या जवानाचा उपचारावेळी मृत्यू !

Operation Sindoor – ऑपरेशन सिंदूर दरम्यान जखमी झालेल्या बक्सर जिल्ह्यातील सैनिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शहीद जवानाची ओळख ४६ वर्षीय हवालदार ‘सुनील सिंह यादव’ अशी आहे. तो चौसा ब्लॉकचा रहिवासी होता. त्याला जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात तैनात करण्यात आले होते.
९ मे रोजी रात्री पाकिस्तानने केलेल्या ड्रोन हल्ल्यात यादव गंभीर जखमी झाले होते. प्राथमिक उपचारानंतर, त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर, त्यांना १५ मे रोजी एअरलिफ्ट करून उधमपूर येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ५ जून रोजी संध्याकाळी उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. संध्याकाळी त्यांच्या कुटुंबियांना लष्कराने त्यांच्या मृत्यूची माहिती दिली. ही बातमी गावात पोहोचताच, परिसरात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, हवलदार सुनील सिंह यादव २००२ मध्ये भारतीय सैन्याच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल इंजिनिअर्स (ईएमई) युनिटमध्ये सामील झाले. २०२३ मध्ये त्यांना हवालदार पदावर बढती मिळाली. ते तीन भावांपैकी सर्वात मोठे होते. त्यांचा धाकटा भाऊ अनिल यादव शेतकरी आहे, तर सर्वात धाकटा भाऊ चंदन यादवही सैन्यात सेवा बजावत आहे.
शहीद जवान यादव यांच्या मागे पत्नी सुजाता देवी आणि दोन मुले १५ वर्षीय सौरभ आणि ८ वर्षीय कृशु यादव आहेत. मोठा मुलगा मॅट्रिकचा विद्यार्थी आहे आणि धाकटा मुलगा पाचवीचा विद्यार्थी आहे. शहीद जवानाची आई पावधारी देवी चौसा येथील मध्य विद्यालयातून प्राचार्य पदावरून निवृत्त झाली आहे. असं त्यांचा संपूर्ण परिवार आहे.





