नवी दिल्ली – परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज जपान, जर्मनी, फ्रान्स आणि स्पेनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केली आणि पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळांवर भारताने केलेल्या कारवाईची त्यांना माहिती दिली. जपानचे परराष्ट्र मंत्री ताकेशी इवाया यांच्याशी फोनवरून झालेल्या संभाषणानंतर सीमापार दहशतवादी पायाभूत सुविधांविरुद्ध भारताच्या कारवाईवर चर्चा झाली, असेजयशंकर म्हणाले. ताकेशी यांनी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून त्यांच्या या प्रतिक्रियेबद्दल समाधान वाटते आहे. भारताने सीमापार दहशतवाद्यांच्या तळांवर आज पहाटेच्या सुमारास केलेल्या कारवाईची त्यांना माहिती दिली, असेही जयशंकर यांनी एक्सवरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जीन-नोएल बॅरोट आणि जर्मनीचे जोहान वडेफुल यांच्याशी संयुक्तपणे फोनवरून चर्चा केली असल्याचे देखील जयशंकर म्हणाले. हलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या नेत्यांनी दाखवलेले ऐक्य आणि पाठिंब्याचे जयशंकर यांनी कौतुक केले. दहशतवादाला शून्य सहनशीलता सुनिश्चित करण्यावर चर्चा केली,” असे ते म्हणाले. स्पेनचे परराष्ट्र मंत्री जोस मॅन्युएल अल्बारेस यांच्याशी फोनवरून झालेल्या चर्चेत जयशंकर यांनी सीमापार दहशतवादाला भारताच्या ठाम प्रतिसादावर चर्चा केली असल्याचेही जयसंकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.