सुवर्ण मंदिरात प्रथमच शस्त्रे तैनात ; शत्रूच्या हवाई हल्ल्यांना मिळणार ‘करारा जवाब’

Operation Sindoor -Golden Temple। भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सुवर्ण मंदिरात प्रथमच हवाई संरक्षण तोफा तैनात केल्या जाणार आहेत. ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानने अमृतसरमधील सुवर्ण मंदिरालाही लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर, सुवर्ण मंदिराच्या मुख्य ग्रंथींनी प्रथमच मंदिर परिसरात शस्त्रे तैनात करण्याची परवानगी सैन्याला दिली आहे.
पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे अमृतसरमधील सुवर्ण मंदिराला नुकतेच लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु भारताच्या मजबूत हवाई संरक्षण यंत्रणेमुळे पाकिस्तानचा प्रत्येक प्रयत्न अयशस्वी झाला. आता सुवर्ण मंदिराची सुरक्षा आणखी वाढवण्यात आली आहे. भारतीय लष्कराच्या संरक्षण कमांडचे महासंचालक लेफ्टनंट जनरल सुमेर इवान डी’कुन्हा यांनी एक वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अनेक खुलासे केले.
सुवर्ण मंदिरावर लेफ्टनंट जनरल डी’कुन्हा यांची प्रतिक्रिया Operation Sindoor -Golden Temple।
मुलाखतीदरम्यान लेफ्टनंट जनरल डी’कुन्हा यांनी, “सुवर्ण मंदिराच्या मुख्य ग्रंथीने इतिहासात पहिल्यांदाच प्रथम हवाई संरक्षण तोफा तैनात करण्याची परवानगी दिली ही खूप चांगली गोष्ट आहे. गेल्या अनेक वर्षांत पहिल्यांदाच सुवर्ण मंदिरातील दिवे काही काळासाठी बंद करण्यात आले. यामुळे ड्रोनच्या हालचाली शोधण्यात मदत झाली.
EP-299 | India’s Air Defence System, Drone Warfare & Chinese Weapons | Lt. Gen. Sumer Ivan D’Cunha#anipodcastwithsmitaprakash #indianarmy #operationsindoor #indiapakistanwar
Premiering now: https://t.co/Nupf9OxKef
— ANI (@ANI) May 19, 2025
पाकचा भारतातील धार्मिक स्थळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न Operation Sindoor -Golden Temple।
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे बदला घेतला. त्यांनी पीओके आणि पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. भारताच्या या प्रत्युत्तराच्या कारवाईनंतर पाकिस्तान घाबरला आणि त्यांच्या सैन्याने अनेक शहरांवर ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारताच्या मजबूत संरक्षण यंत्रणेने पाकिस्तानचा प्रत्येक प्रयत्न हाणून पाडला. पाकिस्तानने भारतातील धार्मिक स्थळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. यासोबतच सामान्य नागरिकांनाही लक्ष्य करण्यात आले.





