“२५ मिनिटांत ९ दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त” ; भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ची दिली माहिती ,वाचा सविस्तर

Operation Sindoor Details । भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. ६-७ मे च्या मध्यरात्री भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाने एकत्रितपणे पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर (POJK) मधील नऊ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. या ठिकाणी लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीनच्या ९०० दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यात आले. भारताने पाकिस्तानविरुद्धच्या या कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव दिले आहे, ज्यावर भारतीय लष्कराने पत्रकार परिषद बोलावली आहे.
फक्त दहशतवादी संघटनांना लक्ष्य Operation Sindoor Details ।
मध्यरात्री भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईनंतर आज भारतीय सैन्याकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत या कारवाईची सम्पूर्ण माहिती देण्यात आली. या कारवाईची माहिती लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांड व्योमीक सिंग यांनी दिली.त्यांनी यावेळी,” त्यांच्याकडे कोणत्या लक्ष्यांच्या आधारे ही कारवाई सुरू करण्यात आली आणि २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याची योजना देखील येथेच आखण्यात आली होती याबद्दल विश्वसनीय माहिती आहे’असे त्यांनी सांगितले. तसेच भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या की, कोणताही नागरिक लक्ष्य होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्यात आली. फक्त दहशतवादी संघटनांना लक्ष्य करण्यात आले.”
#WATCH | Delhi | #OperationSindoor| Foreign Secretary Vikram Misri says, "…Pakistan has been known to willfully mislead the world and international forums, such as the Financial Action Task Force. The Sajid Mir case, in which this terrorist was declared dead and then, in… pic.twitter.com/xgFPvb2Kfx
— ANI (@ANI) May 7, 2025
२५ मिनिटांत ९ तळ उद्धवस्त Operation Sindoor Details ।
कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “६ आणि ७ मे च्या मध्यरात्री १:०५ ते १:३० वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती. ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. कर्नल सोफिया म्हणाल्या की, “हे लक्ष्य विश्वसनीय माहितीच्या आधारे निवडण्यात आले होते आणि निष्पाप नागरिकांना इजा होणार नाही याची काळजी घेण्यात आली होती. जर पाकिस्तानने काहीही करण्याची हिंमत केली तर त्याला योग्य उत्तर दिले जाईल,”असे ते म्हणाले.





