माता-भगिनींचं कुंकू पुसणाऱ्यांचा हिशेब चुकता ; ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताचा पाकिस्तानवर एअर स्ट्राईक

Operation Sindoor। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये आपल्या माता – भगिनींचे कुंकू पुसणाऱ्या पाकिस्तनाच्या दहशतवाद्यांचा बदला भारतीय सैन्याने अखेर घेतला आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला आणि ते उद्ध्वस्त केले. भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर अचूक हल्ला केला. हे दहशतवादी अड्डे पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमध्ये होते. लष्कराच्या या हवाई हल्ल्याला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले आहे. हे हवाई हल्ले त्या दहशतवादी तळांवर करण्यात आले जिथून भारताविरुद्ध दहशतवादी हल्ले करण्याची योजना आखली जात होती. लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, हवाई हल्ल्यात एकूण ९ दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले.
भारतीय लष्कराने म्हटले आहे की, हवाई हल्ल्यात कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आले नाही. लक्ष्यांची निवड आणि त्यांची अंमलबजावणी करण्याच्या पद्धतीमध्ये भारताने बराच संयम दाखवला आहे. पहलगाम येथे झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्यात २५ भारतीय आणि एका नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर भारतीय लष्कराने हे पाऊल उचलले आहे. या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना जबाबदार धरले जाईल या आमच्या वचनबद्धतेचे आम्ही पालन करत आहोत, असे लष्कराने म्हटले आहे.
रात्री अडीच वाजता सर्जिकल स्ट्राईक Operation Sindoor।
संरक्षण मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार भारतीय सैन्यदलांनी पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या ताब्यातील पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांच्या मुलभूत ठिकाणांवर हल्ले करत ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरु केलं. ज्या ठिकाणावरुन भारताविरोधात दहशतवादी हल्ला करण्याची योजना तयार करण्यात आली त्या नऊ ठिकाणांवर हल्ले करण्यात आले. रात्री १ वाजून ४४ वाजता हा स्ट्राईक करण्यात आला.
संरक्षण मंत्रालयाकडून निवेदन जारी Operation Sindoor।
या ठिकाणांवर हा स्ट्राईक करण्यात आला आहे. संरक्षण मंत्रालयानं म्हटलं की, आमची कारवाई केंद्रीत, स्पष्ट आणि कोणताही वाद निर्माण करण्यापासून वाचलेली आहे. आम्ही कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळांवर ठिकाणांवर हल्ला केलेला नाही. भारतानं ठिकाणांची निवड करण्यात आणि ते उद्ध्वस्त करण्यात संयम दाखवला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २५ भारतीय आणि एका नेपाळी नागरिकांची हत्या करण्यात आली होती. संरक्षण मंत्रालयाच्या वक्तव्यानुसार आम्ही आमची कटिबद्धता निश्चित केली आहे.पहलगाम दहशतवादी हल्ल्यास जबाबदार असलेल्यांना उत्तर दिलं जाईल. ऑपरेशन सिंदूर संदर्भातील माहिती नंतर देऊ, असंही संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. ANI ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
भारतानं पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधू जलकरार स्थगित केला आहे. पाकिस्तानचे सर्व प्रकारचे व्हिसा रद्द केलेत. याशिवाय भारतानं पाकिस्तानी दूतावासातील कर्मचारी संख्या देखील कमी केली आहे. भारतीय सैन्य दलांनी केलेल्या कारवाईचं विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी स्वागत केलं आहे. यामध्ये आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, पीयूष गोयल यांचा समावेश आहे.





