Operation Ajay : इस्रायलमधील भारतीयांना सुरक्षितपणे घेऊन दुसरे विमान दिल्लीत दाखल ; 235 नागरिक मायदेशी परतले

India Evacuation Operation : इस्रायलमधील (Israel)नागरिकांना भारतात परत आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या “ऑपरेशन अजय’ (Operation Ajay)अंतर्गत 212 भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन एअर इंडियाचे विमान काल मायदेशी परत आले.तर आज याच मोहिमे अंतर्गत दुसरे विमान भारतात दाखल झाले आहे.
इस्रायलमधून (Israel)भारतीय नागरिकांच्या सुरक्षित परतीसाठी भारताने ‘ऑपरेशन अजय’ (Operation Ajay)सुरू केले आहे. या मोहिमेअंतर्गत इस्रायलमधील भारतीयांचा दुसरा ताफा दिल्लीत पोहोचला आहे. यात 235 भारतीय नागरिकांना घेऊन एक विशेष विमान दिल्लीला पोहोचले आहे. नागरिकांच्या स्वागतासाठी परराष्ट्र राज्यमंत्री राजकुमार रंजन सिंह विमानतळावर उपस्थित आहेत.
भारतीय नागरिकांच्या दुसऱ्या तुकडीत दोन नवजात बालकांसह २३५ नागरिकांचा समावेश होता. स्थानिक वेळेनुसार रात्री 11 वाजता विमानाने इस्रायलहून उड्डाण केले. दरम्यान, काल या मोहिमे अंतर्गत (Operation Ajay)212 भारतीयांना घेऊन पहिले विशेष विमान भारतात दाखल आले होते. भारताने गुरुवारी ‘ऑपरेशन अजय’ची घोषणा केली होती. इस्रायलमध्ये (Israel)राहणाऱ्या भारतीयांचे सुरक्षित परतणे हा त्याचा उद्देश आहे. या ऑपरेशनद्वारे इस्रायलमधून (Israel)तेच लोक आणले जात आहेत, जे तेथून येण्यास इच्छुक आहेत.
इस्रायलमधील (Israel)भारतीय दूतावासाने, शनिवारपर्यंत भारतीय नागरिकांना इस्रायलमधून (Israel )बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू राहणार असल्याची माहिती दिली आहे. दूतावासाने ट्विटरवर लिहिले, ‘दूतावासाने आज विशेष फ्लाइटसाठी नोंदणी केलेल्या भारतीय नागरिकांच्या पुढील बॅचला ईमेल केले आहे. त्यानंतरच्या फ्लाइटसाठी इतर नोंदणीकृत लोकांना संदेश पाठवला जाईल. ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर प्रवाशांची निवड केली जात आहे. यासाठी प्रवाशांना त्यांची माहिती दूतावासाच्या डेटाबेसमध्ये भरावी लागेल.
इस्रायलमध्ये (Israel)किती भारतीय राहतात?
इस्रायलमध्ये (Israel) राहणाऱ्या भारतीयांची संख्या 18,000 आहे. यामध्ये बहुतांश विद्यार्थी, आयटी व्यावसायिक आणि हिरे व्यापारी यांचा समावेश आहे. भारतात परतलेल्या लोकांना परत आणण्याचा खर्च सरकार स्वतः उचलत आहे. हमासने गाझा पट्टीतून इस्रायलवर हल्ला केल्याने भारतीय नागरिकांच्या मायदेशी परतण्याची वेळ आली आहे. इस्रायलवर केवळ क्षेपणास्त्रांनीच हल्ला केला नाही तर जमिनीवर घुसखोरीही करण्यात आली. इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या आठवडाभरापासून युद्ध सुरू आहे.





