स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नातूचं शिवानी वडेट्टीवार यांना ओपन चॅलेंज,’..असे सावरकरांचे विचार’

चंद्रपूर – प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिव शिवानी वडेट्टीवार यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका कार्यक्रमात बोलतांना शिवानी वडेट्टीवार म्हणाल्या,’बलात्कार हे राजकीय शस्त्र असून हे शस्त्र तुम्ही आपल्या राजकीय विरोधात वापरले पाहिजे, असे सावरकरांचे विचार होते.’ यामुळे महिलांना भीती वाटत असते.. या व्हिडीओमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. उपस्थित लोकांसमोर त्या आक्रमकरित्या आपले विचार मांडताना दिसून येत आहे.’
दरम्यान, त्यांच्या या विधानावर आता स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सात्यकी सावरकर यांनी शिवानी वडेट्टीवार यांना ओपन आव्हान दिलं आहे. “शिवानी वडेट्टीवार यांनी केलेला दावा चुकीचा आहे. सावरकरांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांनी तसं स्टेटमेंट शोधून दाखवावं”, असं चॅलेंज सात्यकी सावरकर यांनी दिलं आहे.
दरम्यान माध्यमांशी बोलतांना सात्यकी म्हणाले,’अत्यंत चुकीचं विधान आहे. सावरकरांनी असं कुठलंही वाक्य सहा सोनेरी पण या पुस्तकात लिहिलेलं नाही, त्यांनी पूर्ण पुस्तक वाचले असेल आणि त्यात लिहिले असेल तर त्यांनी मला ते दाखवावा.’ असेही ते म्हणाले आहे. सावरकर हे हिंदुत्ववादी नेते होते. महाराष्ट्रात आणि देशात हे हिंदुत्ववादी सरकार आहे जे सावरकरांच्या विचारांच्या जवळ जाऊ शकतं. ज्यांची हातातून सत्ता गेली आहे, कुणाचं तरी लांगुलचालन करुन सत्ता परत मिळावी या केवळ राजकीय लाभापोटी सावरकरांना लक्ष केलं जातंय”, असं सात्यकी सावरकर म्हणाले.





