ऑनलाईन दरोडा! एसबीआय आणि एचडीएफसी दोन्ही खात्यांवर सायबर हल्ला ; ८ दिवसांत बँकेतून ९ लाख लंपास
Updated On:

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – एका व्यावसायिकाचा मोबाइल हॅक करून त्यांच्या एसबीआय आणि एचडीएफसी बँक खात्यातून वेळोवेळी एकूण ९ लाख ३४ हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने ट्रान्सफर करून घेतले. ही घटना १९ ऑगस्ट आणि २५ ऑगस्ट रोजी मोशी येथे ऑनलाइन पद्धतीने घडली.याप्रकरणी एका ४१ वर्षीय व्यक्तीने शनिवारी (दि. २७) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने फिर्यादीचा मोबाइल हॅक करून त्यांच्या एसबीआय बँक खात्यावरून ५० हजार रुपये आणि एचडीएफसी बँक खात्यावरून ८ लाख ८४ हजार रुपये असे एकूण ९ लाख ३४ हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने इतर बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर करून घेऊन त्यांची फसवणूक केली. एमआयडीसी भोसरी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
