ऑनलाईन ‘प्रेमसंबंधाचा स्फोट’: समलैंगिक नातं संपवलं म्हणून बदनामीचा घात…

पुणे : डेटिंग अॅपवर सुरू झालेली ऑनलाईन मैत्री आणि त्यातून फुललेलं गुपित प्रेम. मात्र नात्याचा शेवट झाला म्हणून एका तरुणाने अत्यंत टोकाच पाऊल उचलले. त्याने केलेल्या कृत्यामुळे त्याच्या साथीदाराच्या संपुर्ण कुटुंबाची बदनामी झाली. यामुळे त्याच्या पत्नीला अखेर पोलीस ठाण्याचा रस्ता धरावा लागला.
पुण्यातील शिवणे परिसरातील ही घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. एका ३४ वर्षीय महिलेच्या तक्रारीनुसार, तिच्या शिक्षक पतीची एका हॉटेल व्यवसायिकाशी इन्स्टाग्रामवरून ओळख झाली. मैत्रीतून प्रेम वाढलं आणि दोघे जवळपास दोन वर्षे समलैंगिक संबंधात होते. मात्र नंतर पतीला आपल्या कुटुंबाची आणि या संबंधांची जाणीव झाली आणि त्याने संबंध तोडले. हे पचवू न शकलेल्या आरोपीने नंतर एक भयंकर पाऊल उचलल.
त्याने ग्राईंडरवर ॲपवर फेक प्रोफाइल तयार करून, फिर्यादीच्या पतीची नग्न छायाचित्रं, पत्नीसोबतचे फोटो, आणि एचआयव्ही पॉझिटिव्ह अशी खोटी माहिती प्रसारित केली. इतकंच नव्हे तर, सतत पाठलाग, धमक्या आणि सोशल मीडियावर बदनामी सुरू केली. परिणामी फिर्यादी महिलेला कुटुंब वाचवण्यासाठी सहकारनगर पोलीस ठाण्यात धाव घ्यावी लागली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक सुरेखा चव्हाण तपास करत आहेत





