नाशिकमध्ये कांदा, टोमॅटोने केले मतदान; शेतकऱ्यांकडून निर्यात बंदीचा रोष अनोख्या पद्धतीने व्यक्त

Nashik | Farmers | Voting – लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या तर राज्यातील शेवटच्या टप्प्यासाठी मतदान पार पडत आहे. मुंबईतील 6 जागांसह राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये आज मतदान पार पडले. मात्र काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने केलेल्या कांदा निर्यात बंदीचा रोष नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आज अनोख्या पद्धतीने मतदान करत शासनाचे लक्ष आपल्याकडे वेधण्याचा प्रयत्न केला.
शेतकऱ्यांनी कांदे आणि टोमॅटोचा वापर करत मतदान केले. एवढेच नाहीतर त्यांनी केंद्राच्या आतमध्ये मोबाइल नेते शुटींगही केले. केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीमुळे नाराज असलेल्या नाशिकच्या चांदवड तालुक्यातील वडगाव-पंगू येथील काही तरुण शेतकऱ्यांनी कांद्याला भाव नसल्याने अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला.
ऐन कांदा काढणीच्या वेळी केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्याने बाजारपेठेतील बाजारभाव कोसळले होते. याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे तरुण शेतकऱ्यांनी आज मतदानाला जाताना कांद्याच्या माळा गळ्यात घालून मतदान केंद्रात जाण्याचा प्रयत्न केला.
मात्र पोलिसांनी त्यांना गेटवरच अडवले आणि कांद्याच्या माळा काढण्यास सांगितले. यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांसोबत वाद घालण्याचा प्रयत्न केला, मात्र अखेर त्यांनी गळ्यातील माळा काढून मतदान केंद्रात प्रवेश केला.
तसेच काही ठिकाणी शेतकऱ्यांनी ईव्हीएमवर मतदान करताना चक्क टोमॅटोचा वापर केला. एवढेच नाही तर त्यांनी मतदान करताना मोबाइलने शुटींगही केले. टोमॅटोच्या साहाय्याने बटन दाबून मतदान करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
तसेच शेतकरी कोणाला मतदान करत आहेत, हेही दिसत आहे. सकाळी अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांनी ईव्हीएमला हार घालून मतदान केले होते. त्यामुळे तेही चर्चेत आले होते.





