Onion Export : कांदा खरेदीबाबत केंद्रीयमंत्री भारती पवारांची माहिती; म्हणाल्या “गेल्या दोन दिवसांत 3 हजार क्विंटल…”

नाशिक – राज्यात कांद्याचे भाव गडगडल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केले. तसेच विरोधकांनीही हा मुद्दा उचलून धरत अर्थसंकल्पीय अधिवेनशात सरकारची कोंडी केल्याने कांदा प्रश्न चांगलाच गाजत आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाफेडकडून कांदा खरेदी सुरू असल्याचे स्पष्टीकरण दिले. गेल्या दोन दिवसांत 3 हजार क्विंटल कांद्याची खरेदी करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली आहे. कांदा निर्यात बंद नव्हती, तर निर्यात सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या काही दिवसांपासून कांदा प्रश्न पेटला असून राज्यभरात शेतकऱ्याकडून आंदोलन करण्यात आले. याची दखल विधिमंडळाच्या सभागृहात देखील घेण्यात आली. यावेळी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर कांद्याला हमीभाव देण्याबाबत आंदोलन केले. शिवाय सभागृहात देखील कांदा हमीभावाचा विषय मांडण्यात आला. कांदा दरप्रश्नी शेतकऱ्यांनी बाजार समितीतील लिलाव बंद पाडले. अशातच भारती पवार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/mlas-of-mahavikas-aghadi-are-aggressive-for-the-third-day-against-the-hike-in-electricity-and-gas-rates/
भारती पवार म्हणाल्या, नाशिकसह जिल्ह्यातील विविध भागात नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी सुरु करण्यात आली असून मागील दोन दिवसांत 3 क्विंटल कांदा खरेदी करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यातून कांदा खरेदी केली जात आहे. शेतकऱ्यांच्या कांद्याला नाफेडच्या माध्यमातून उचल मिळते आहे. तसेच ज्यांना-ज्यांना शक्य त्यांनी निर्यात करावी. शेजारील राष्ट्राच्या आर्थिक स्थितीमुळे कांदा निर्यातीवर परिणाम झाला होता. यापुढेही कांदा निर्यात आणि नाफेडकडून कांदा खरेदी सुरू राहील, अशी माहिती त्यांनी दिली.
परिस्थिती “जैसे थे’
सोमवारी झालेल्या आंदोलनानंतर पुन्हा पूर्ववत लिलाव प्रक्रिया सुरु झाली असून सुरुवातीच्या लिलावात साडेचारशे रुपयापासून बाजार खुले झाले. कमीतकमी कमी हजार रुपये भाव मिळावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले होते. मात्र आंदोलनानंतर परिस्थिती “जैसे थे’ आहे. दुसरीकडे सभागृहात विरोधकांनी कांद्याला हमीभाव देण्याबाबत मागणीला जोर लावला आहे.





