कांद्याच्या माळा गळ्यात घालून शेतकरी पोहचले मतदान केंद्रावर; छगन भुजबळ म्हणाले…

Chhagan Bhujbal | देशासह राज्यात आज पाचव्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. सकाळी सात वाजल्यापासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र राज्यात कांद्याच्या प्रश्नावरून शेतकरी संताप व्यक्त करताना दिसत आहे. यातच आता मतदानादरम्यान शेतकऱ्यांनी कांदा प्रश्नासंदर्भात चीड व्यक्त केली आहे.
यावेळी कांद्याच्या माळा गळ्यात घालून काहींनी मतदान करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान काही शेतकरी तरुणांना पोलिसांनी अडवले. त्यामुळे शेतकरी आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे मतदान केंद्रांवर काही वेळ गोंधळ निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.
कांद्याला भाव नसल्याचा निषेध करत नाशिकच्या चांदवड तालुक्यातील वडगाव-पंगू येथील काही तरुण शेतकऱ्यांनी कांद्याच्या माळा गळ्यात घालून मतदानाला जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, या तरुणांना मतदान केंद्राच्या गेटवरवर पोलिसांनी आडवले आणि गळ्यातील कांद्याच्या माळा काढण्यास सांगितले. या प्रकरणावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी मतदारांना कांद्याच्या माळा घालून काही होणार नाही, त्यासाठी सत्याग्रह करा,” असे आवाहन केले आहे. Chhagan Bhujbal |
नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?
“मतदान केंद्रात कांद्याच्या माळा नेऊन मतदान अधिकारी त्यावर काही करू शकत नाही. त्यामुळे मतदान करा. कांद्याच्या माळा घालून गेलो, म्हणून मतदान करू शकलो नाही असं करू नका. कांद्याच्या माळा आम्हाला दाखवा, जे कोणी राजकारणी आहेत त्यांना दाखवा. राजकारण्यांपुढे सत्याग्रह करा, मतदान अधिकारी काय करणार,” असं छगन भुजबळ म्हणाले. Chhagan Bhujbal |
हेही वाचा:
स्मृती इराणी यांनी अमेठीत बजावला मतदानाच हक्क ; रांगेत उभे राहून केले मतदान




