OnePlus mobile: वनप्लस (One Plus) ने भारतात आपले दोन नवे मिड-रेंज स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. ‘वनप्लस नॉर्ड सीई 6’ आणि ‘वनप्लस नॉर्ड सीई 6 लाइट’ या स्मार्टफोनमध्ये दमदार बॅटरी, वेगवान प्रोसेसर आणि प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे 30 हजार रुपयांच्या श्रेणीत या फोनमध्ये असे काही फीचर्स देण्यात आले आहेत, जे आतापर्यंत महागड्या फ्लॅगशिप फोनमध्येच पाहायला मिळत होते. ‘वनप्लस नॉर्ड सीई 6’मध्ये 6.78 इंचाचा 1.5K AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 144Hz रिफ्रेश रेट आणि 3600 निट्स पीक ब्राइटनेस सपोर्ट करतो. त्यामुळे गेमिंग आणि व्हिडिओ पाहण्याचा अनुभव अधिक चांगला मिळणार आहे. या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7s जनरेशन 4 प्रोसेसर देण्यात आला आहे. यासोबत 8GB आणि 12GB रॅमचे पर्याय उपलब्ध आहेत. गेमिंगसाठी या फोनमध्ये टच रिफ्लेक्स चिप देण्यात आली आहे. कंपनीच्या माहितीनुसार हा फोन अनेक गेम्स 144FPS वर चालवू शकतो. तसेच फोन गरम होऊ नये यासाठी मोठा वेपर चेंबर कूलिंग सिस्टमही देण्यात आला आहे. (OnePlus mobile) या स्मार्टफोनची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याची 8000mAh बॅटरी. ही बॅटरी 80W सुपरव्हूक फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच 27W रिव्हर्स चार्जिंग फीचरही देण्यात आले आहे. म्हणजेच या फोनद्वारे इतर डिव्हाइसही चार्ज करता येतील. (OnePlus mobile) OnePlus mobile: 8000mAh बॅटरी आणि 144Hz डिस्प्लेसह वनप्लसचे दोन नवे स्मार्टफोन लॉन्च फोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा अतिरिक्त सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. फ्रंट आणि रियर दोन्ही कॅमेरे 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगला- सपोर्ट करतात. (OnePlus mobile) हा फोन अँड्रॉइड 16 आधारित ऑक्सिजनओएस 16 वर चालतो. ‘वनप्लस नॉर्ड सीई 6’ची सुरुवातीची किंमत 29,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या फोनची विक्री 7 मेपासून सुरू होणार असून सुरुवातीला 2 हजार रुपयांचा बँक डिस्काउंटही मिळणार आहे. दुसरीकडे ‘वनप्लस नॉर्ड सीई 6 लाइट’ हा कंपनीचा अधिक किफायतशीर स्मार्टफोन आहे. यात 6.72 इंचाचा FHD+ LCD डिस्प्ले आणि 144Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. हा फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 7400 एपेक्स प्रोसेसरवर चालतो. (OnePlus mobile) या फोनमध्ये 7000mAh बॅटरी आणि 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. तसेच 50 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यात AI इरेझर आणि AI रिफ्लेक्शन रिमूव्हर सारखी AI फीचर्सही आहेत. ‘वनप्लस नॉर्ड सीई 6 लाइट’ची विक्री 12 मेपासून सुरू होणार आहे. निवडक बँक कार्डवर ग्राहकांना 2 हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.