Soldiers injured : रायफल हिसकावण्याच्या प्रयत्नात एकाचा मृत्यू तर, ३ जवान जखमी
या घटनेच्या संदर्भात पोलिसांनी एका धार्मिक उपदेशकालाही ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचा सहभाग नेमका कशा प्रकारे होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Soldiers injured – जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात एका व्यक्तीने सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून सर्व्हिस रायफल हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर झालेल्या गोळीबाराच्या घटनेत त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि स्पेशल ऑपरेशन्स ग्रुपचे तीन जवान जखमी झाले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली.
गुरुवारी रात्री उशिरा घडलेल्या या घटनेच्या संदर्भात पोलिसांनी एका धार्मिक उपदेशकालाही ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचा सहभाग नेमका कशा प्रकारे होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
उंचावरील भागात संशयास्पद हालचालींची माहिती मिळाल्यानंतर एसओजीच्या एका पथकाने भदरवाह शहरापासून सुमारे ३५ किमी अंतरावर असलेल्या जाई-गांदोह रस्त्यावर सापळा रचला होता.
रात्री साडेअकराच्या सुमारास, पथकाने चीका गावातील रहिवासी असलेल्या आरिफ हुसेन (वय ३०) या तरुणाला अडवले. त्याने सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हल्ला करून त्यांची सर्व्हिस रायफल हिसकावण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून झटापट झाली.
या झटापटीदरम्यान, एसओजीच्या एका जवानाने गोळीबार केला. यात तो तरुण गोळी लागल्याने जखमी झाला, तर तीन पोलीस कर्मचारीही जखमी झाले,” असे अधिकाऱ्याने सांगितले.
जखमी झालेल्या चौघांनाही सुरुवातीला भदरवाह येथील उप-जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आणि त्यानंतर विशेष उपचारांसाठी डोडा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले. उपचारादरम्यान हुसेनचा मृत्यू झाला.





