Punjab Election 2022: एक लाख सरकारी नोकऱ्या देऊ – चन्नी
Updated On:

चंदीगड – पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी पंजाबात कॉंग्रेस सत्तेवर आल्यास तरुणांना एक लाख सरकारी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले आहे.
आज येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे आश्वासन दिले. ते म्हणाले की, राज्यातील युवकांसाठी शिक्षण आणि उच्च शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. आजकाल शिक्षण खूप महाग झाले आहे. ते परवडणाऱ्या दरांत असले पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे ते म्हणाले.
राज्यातील कोणताही युवक शिक्षणापासून वंचित राहणार नाही हे पाहण्याची जबाबदारी राज्य सरकारची असते ती जबाबदारी आम्ही पार पाडू, असे ते म्हणाले. गरीब वर्गातील विद्यार्थ्यांसाठी अधिकाधिक शिष्यवृत्ती देण्याचा मनोदयही त्यांनी यावेळी व्यक्त केला.





