पुणे जिल्हा | भोर महाड रस्त्यावर अपघातात एकाचा मृत्यू, एक जखमी

वीसगाव खोरे, (वार्ताहर) – वेनवडी (ता.भोर) येथील ग्रामपंचायतीच्या हद्दीत भोर महाड रस्त्यावर महांगिर ओढ्यावरील पुलावर मालवाहू छोटा हत्ती (टेम्पोने) दुचाकीला दिलेल्या धडकेत झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू, एक जखमी झाल्याची घटना बुधवार (दि.१०) सकाळी ८.२५ मिनिटांनी घडली. मँकेनिकल इंजिनियर असलेल्या अतुल मारुती शिंदे यांच्या निधनामुळे वेनवडी गावावर शोककळा पसरली.
अतुल मारुती शिंदे (वय ३२) असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत जखमी असलेले फिर्यादी शुभम नंदू साळेकर (वय २३) यांनी भोर पोलीस ठाण्यात खबर दिली. हा अपघात मँकेनिकल इंजिनिआर असलेल्या अतुल मारुती शिंदे (वय ३४, रा. वेनवडी, ता भोर) याचा अपघातात मृत्यू झाला. यामुळे वेनवडी गावावर शोककळा पसरली आहे.
तर अपघातात शुभम नंदु साळेकर (वय २३, रा.वेनवडी) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी टेम्पोचालक रामचंद्र सर्जेराव बांदल (मूळ गाव पिसावरे, ता. भोर, सध्या रा. बिरवाडी, ता. महाड) याला भोर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
भोर पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार भोर येथून भाजीपाला भरून एस.एच ०६ बी डब्ल्यु ८०५६ हा छोटा हत्ती (टेम्पो) महाडच्या दिशेने जात असताना वेनवडीवरून भोरच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकी एम एच १२ एन.एन ४८४७ वरून जात असलेल्या दुचाकीला समोरासमोर धडक दिली.
यात अतुल शिंदे हा तरुण जागीच ठार तर शुभम नंदु साळेकर गंभीर जखमी झाला आहे. त्या खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. अपघातात मृत्यू पावलेला अतुल मारुती शिंदे हा मॅकेनिकल इंजिनिअर असून खाजगी कंपनीत कामाला होता. तो दररोज वेनवडी येथून दुचाकीवरुन कामाला जात होता. आज सकाळी काळाने त्याच्यावर घाला घातला. यामुळे वेनवडी गावावर शोककळा पसरली आहे.





