वेगाचा राजा बोल्टला शंभर कोटींचा फटका; गुंतवणूक केलेल्या कंपनीच्या खात्यातून पैसे गायब

जमैका – मैदानी क्रीडा स्पर्धेचा बादशहा मानला जात असलेला जमैकाचा सर्वात वेगाने धावणारा धावपटू उसेन बोल्ट याला तब्बल शंभर कोटींचा फटका बसला आहे. शंभर मीटर अंतराची शर्यत जादूई वेगाने विक्रमी वेळेत पूर्ण करणाऱ्या बोल्टच्या खात्यातून तब्बल शंभर कोटी रुपये गायब झाले आहेत.
दडपणातही खराब चेंडूंवर आक्रमण केले; द्विशतकवीर गिलने केला खुलासा
बोल्टने त्याला मिळालेल्या काही रकमेतून काही रक्कम स्टॉक् ऍन्ड सिक्युरिटीज या कंपनीमध्ये गुंतवली होती. त्यातून 12 मिलियन डॉलर (जवळपास शंभर कोटी रुपये) गायब झाले आहेत. हे प्रकरण उघड झाल्यावर बोल्टने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. जमैकाच्या वित्तीय सेवा आयोगाने स्टॉक्स अँड सिक्युरिटीज या संस्थेवर प्रशासक नेमण्यात आला आहे. या संस्थेविरोधात आर्थिक फसवणुकीचे आरोप झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे आता बोल्टचे गायब झालेले पैसे परत मिळणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.




