विटांचा ट्रॅक्टर अंगावर पलटी होऊन एकाचा मृत्यू
Updated On:

जामखेड – जामखेड तालुक्यातील राजुरी गावाजवळ विटांचा ट्रॅक्टर अंगावर पलटी होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला. शिवाजी संपत काळे (वय 60, रा. पाटोदा (गडाचे) असे मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
जामखेडपासून 8 किलोमीटर अंतरावर जामखेड-खर्डा रोडवरील राजुरी गावाजवळ विटा घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटी झाला. यावेळी या ट्रॅक्टरच्या वरती बसलेला शिवाजी संपत काळे याचा या विटांखाली दबून जागीच मृत्यू झाला. उताराला या ट्रॅक्टरला ब्रेक न लागल्याने ट्रॉली पलटी झाल्याची माहिती मिळाली.
सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी हे रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी गेले असता मृतदेह रुग्णवाहिकेत आणून ग्रामीण रुग्णालय, जामखेड येथे दाखल केला. वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज शिंदे आणि किशोर बोराडे यांनी शवविच्छेदन केले. पुढील पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अजय साठे हे करत आहेत.





