बारामतीत जनता कर्फ्यूच्या तिसऱ्या दिवशी 124 जणांना कोरोनाची लागण
Updated On:

बारामती (प्रतिनिधी) : बारामती शहर व तालुक्यात नव्याने 124 कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आल्याचे तपासणी अहवालात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे बारामतीत एकूण रुग्णांची संख्या 1655 इतकी झाले असून 679 रुग्ण आत्तापर्यंत बरे झाले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शहर व तालुक्यात सोमवारपासून जनता कर्फ्यू लावण्यात आलाआहे. जनता कर्फ्यूचा आज तिसरा दिवस असून काल दिवसभरात 124 रुग्ण आढळून आल्याने बारामतीकरांची चिंता पुन्हा वाढली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला तर बारामती सुरू राहणार की जनता कर्फ्यू वाढणार याबाबत 13 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. प्रादुर्भाव कमी झाला नाही तर 20 सप्टेंबर पर्यंत जनता कर्फ्यू वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काल शहरी भागात 68 तर ग्रामीण भागात 56 कोरोना संक्रमीत रुग्ण आढळले.





