Pankaja Munde : पंकजा मुंडे यांचं पक्षांतरावर गिरीश महाजन म्हणाले,’नंतर काय ते बोलता येईल…’

Updated On:

Pankaja Munde : पंकजा मुंडे भाजप सोडणार असल्याची चर्चा गेल्या वर्षभरापासून सुरु आहे. अनेकदा विरोधी पक्षातील नेत्यांनीही भाजप पक्षाला पंकजा मुंडेंचा विसर पडला असल्याचे विधान केले आहे. अलीकडेच पंकजा मुंडे यांना तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची ऑफर असल्याचीही चर्चा रंगली होती. अशात पंकजा मुंडे यांनी या चर्चांवर आपली भूमिका स्पष्ट करत सांगितले होते की,’दुसऱ्या पक्षात जाण्याइतपत मी लेचीपेची नाही, असं विधान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं आहे. पंकजा मुंडे यांनी जाहीरपणे पक्षांतर करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

त्यामुळे पंकजा मुंडे या भाजप सोडण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. पंकजा मुंडे यांच्या या विधानावर भाजपमधून पहिली प्रतिक्रिया आली आहे. भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी मीडियाशी बोलतांना पंकजा यांच्या विधानवर भूमिका मांडली आहे. पंकजा मुंडे यांनी जे वक्तव्य केल ते पक्षाच्या संदर्भात नसेल. मी नेमकं त्याच भाषणं ऐकलं नाही. ऐकल्या नंतर काय ते बोलता येईल, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मागील काही वर्षांपासून पंकजा मुंडे  यांना भाजपने राज्याच्या राजकारणातून दूर केल्याचे चित्र दिसून आले आहे. यावर त्यांनी खंत देखील व्यक्त केली. आता  सावरगाव येथे होणाऱ्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी भाषण दरम्यान अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी आपल्या मानतील अनेक गोष्टी बोलून दाखवल्या आहेत.

आणखी संबंधित बातम्या

Pune Water Cut: पुणेकरांनो १५ ऑक्टोबरपासून पाणी कपात होणार? महापालिका प्रशासनाची मोठी अपडेट समोर

2026-10-06 07:00:30

Pune Water Cut: पुणेकरांनो १५ ऑक्टोबरपासून पाणी कपात होणार? महापालिका प्रशासनाची मोठी अपडेट समोर

Pankaja Munde : "सरकार शेतकऱ्यांची दिवाळी गोड करेल" - पंकजा मुंडे

2026-10-05 18:12:55

Pankaja Munde : "सरकार शेतकऱ्यांची दिवाळी गोड करेल" - पंकजा मुंडे

Pankaja Munde: "सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार" ; पंकजा मुंडे यांचं आश्वासन

2026-09-26 14:47:13

Pankaja Munde: "सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार" ; पंकजा मुंडे यांचं आश्वासन

Girish Mahajan: गणेश विसर्जन मिरवणुकीत पालकमंत्री गिरीश महाजन यांचा ढोल वादनाचा ठेका

2026-09-25 13:48:18

Girish Mahajan: गणेश विसर्जन मिरवणुकीत पालकमंत्री गिरीश महाजन यांचा ढोल वादनाचा ठेका

Shrimant Bhausaheb Rangari: पंकजा मुंडे, हर्षवर्धन सपकाळांकडून भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन

2026-09-22 07:49:48

Shrimant Bhausaheb Rangari: पंकजा मुंडे, हर्षवर्धन सपकाळांकडून भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन