अर्थसंकल्पावर अजित पवार म्हणाले,”महाराष्ट्र आणि देशवासियांची मने जिंकणारा अर्थसंकल्प”

Ajit Pawar on budget । अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात तरुणांसोबत महिलांचीही विशेष काळजी घेण्यात आली आहे. त्यासोबतच युवकांसाठी तब्बल २ लाख कोटींची तरतूद करण्यात करण्यात आली आहे. दरम्यान, या अर्थसंकल्पावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“महाराष्ट्र आणि देशवासियांची मने जिंकणारा अर्थसंकल्प” Ajit Pawar on budget ।
अर्थसंकल्पाविषयी बोलताना अजित पवार यांनी,”प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सलग तिसऱ्या एनडीए सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प महाराष्ट्र आणि देशवासियांची मने जिंकणारा अर्थसंकल्प ठरल्याचे म्हटले. तसेच मध्यमवर्गीय आणि नोकरदार वर्गाच्या आशा-आकांक्षा-अपेक्षांची पूर्तता करणारा, शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, सहकार, रोजगार, स्वयंरोजगार, विज्ञान, संशोधन, कौशल्यविकास, सामाजिक न्याय, महिला सक्षमीकरण अशा सर्व क्षेत्रांच्या विकासाला बळ देणारा, मजबूत-विकसित भारताची पायाभरणी करणारा, देशाला विश्वशक्ती बनवण्याच्या वाटेवर नेणारा हा अर्थसंकल्प आहे,” असे म्हणत त्यांनी अर्थसंकल्पावर समाधान व्यक्त केले.
निर्मला सीतारामन यांचे मी मन:पूर्वक अभिनंदन करतो Ajit Pawar on budget ।
पुढे बोलताना त्यांनी “शहरी व ग्रामीण विकासाचा समतोल साधणारा, समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित, मागास, अल्पसंख्याक घटकांच्या विकासावर भर देणारा एक चांगला, दूरदृष्टीपूर्ण, लोककल्याणकारी अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मी मन:पूर्वक अभिनंदन करतो, असेही अजित पवार यांनी म्हटले. तसेच, या अर्थसंकल्पातून नेमकं काय मिळालं, यााची माहितीही त्यांनी दिलीय.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि एनडीए सरकारचे स्वप्न आहे. स्वातंत्र्याच्या शतकमहोत्सवाआधी हे स्वप्न पूर्ण करायचे आहे. या स्वप्नपूर्तीसाठी दूरदृष्टीने हा अर्थसंकल्प सादर करण्यात आल्याचे सांगत त्यांनी अर्थसंकल्पात कोणत्या क्षेत्रासाठी काय मिळालं याची माहिती दिली.
शेती क्षेत्रात उत्पादकतावाढ, रोजगार, स्वयंरोजगार, कौशल्यविकासावर भर, मनुष्यबळ विकास व सामाजिक न्यायाकडे विशेष लक्ष, उत्पादन व सेवाक्षेत्राचा विकास ,शहरांच्या नियोजनबद्ध विकासावर भर, ऊर्जासंरक्षण 7) पायाभूत सुविधांचा विकास , संशोधन व विकासाला प्राधान्य, ,नव्या पीढीसाठी सुधारणा या 9 क्षेत्रांना दिलेलं प्राधान्य देशाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा, देशाला सर्व क्षेत्रात पुढे घेऊन जाणारा निर्णय असल्याचे त्यांनी म्हटले.





