सुशांत प्रकरणावर मुंबई पोलीस आयुक्त म्हणाले,’ते बदनाम करत होते’

मुंबई – अभिनेता सुशांत सिंह याच्या मृत्यू प्रकरणात सीबीआयला मदत करण्यासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या तज्ज्ञांची जी एक फॉरेन्सिक समिती नेमण्यात आली होती, त्या समितीने सुशांतसिंह याची हत्या झालेली नसून ती एक आत्महत्याच आहे, असा स्पष्ट निर्वाळा दिला आहे.
दरम्यान, एम्स रुग्णालयाच्या अहवालाबाबत मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आपलं व्यक्त केलं होत. तर आता वृत्तवाहिनीशी बोलताना परमबीर सिंग म्हणाले, ‘ या प्रकरणी तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांवर अनेक आरोप करण्यात आले होते.
मात्र या आरोपांना त्यांनी उत्तर दिलं असून ते म्हणाले, या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अत्यंत योग्य पद्धतीने तपास केला होता असं सांगितलं आहे. तापसावेळी त्यांनी काही प्रसार -माध्यमांमध्ये काही जण मुंबई पोलिसांची बदनामी करत खोटी माहिती पसरवत होते असा आरोप केला असून एक मोहीम चालवली जात होती.’
ते पुढे म्हणाले, ‘मीडियामधील काही जण अजेंडा चालवत असून मुंबई पोलिसांची बदनामी करत खोटी माहिती पसरवत होते. असंही ते पत्रकारांशी बोलतांना म्हणाले होते.’
तत्पूर्वी, परमबीर सिंग यांनी फॉरेन्सिक समिती समितीने सुशांतसिंह याची हत्या झालेली नसून ती एक आत्महत्याच आहे, असा स्पष्ट निर्वाळा दिल्यानंतर ‘आम्ही खरे आहोत’ असं म्हणत आपली भूमिका मांडली होती.
दरम्यान, सुशांतच्या कुटुंबीयांनी आणि त्याच्या वकिलांनी सुशांत याला विष देऊन मारण्यात आल्याचा आरोप केला होता. 14 जून 2020 रोजी सुशांत आपल्याच निवासस्थान मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करून त्याला न्याय मिळवून देण्यासाठी सोशल मीडीयावर काही गटांनी सध्या मोठीच मोहीम चालवली असतानाच हा अहवाल आल्याने त्याला विशेष महत्त्व दिले जात आहे.





