Abhijit Deepke : एकीकडे आंदोलनाचा इशारा; दुसरीकडे अभिजीत दिपकेंचा नवा व्हिडिओ, स्पष्टचं म्हणाले…
Abhijit Deepke : या पार्श्वभूमीवर या पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियावरुन एक व्हिडिओ जारी केला असून, या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी सदस्यांना महत्वाचे आवाहन केले आहे.

Abhijit Deepke : सध्या सोशल मीडियावर ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) धुमाकूळ घालत आहे. तरुणांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद या पार्टीला मिळत असून, सदस्यांची संख्या वाढत आहे.
अशातच ‘कॉकरोच जनता पार्टी’चे नाव घेत विविध ठिकाणी निर्दर्शन केली जात आहे. या पार्श्वभूमीवर या पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियावरुन एक व्हिडिओ जारी केला असून, या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी सदस्यांना महत्वाचे आवाहन केले आहे.
अभिजित यांनी पक्षाच्या नावाने होत असलेल्या कथित आंदोलनांवर व्हिडिओमध्ये भाष्य केले आहे. “कॉकरोच जनता पार्टीने कोणत्याही आंदोलनाची घोषणा केलेली नाही. काही ठिकाणी होत असलेल्या निदर्शनांशी आमचा काहीही संबंध नाही,” असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. (Abhijit Deepke)
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिपके यांनी समर्थकांना घाईघाईत कोणतेही पाऊल उचलू नये, असे आवाहन देखील केले आहे. “ही मोठी लढाई आहे. काही लोक मुद्दाम आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.
दिपकेंचा दावा (Abhijit Deepke)
काही गट कॉकरोच जनता पार्टीच्या नावाचा वापर करून आंदोलन घडवून आणत आहेत, मात्र त्या कृतींशी पक्षाचा कोणताही संबंध नाही असे स्पष्ट करत “ज्यांना आपल्या चळवळीचा त्रास होत आहे, तेच लोक असे प्रकार करून आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत,” असा दावा अभिजित दिपके यांनी केला आहे.
अभिजीत दिपके मूळचे महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील रहिवासी आहेत. सध्या अमेरिकेतील बोस्टन येथे ते शिक्षण घेत आहेत. त्यांनी सुरू केलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ या डिजिटल मोहिमेला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
इन्स्टाग्रामवर या पेजचे फॉलोअर्स २ कोटींहून अधिक झाले होते. मात्र, दिपके यांनी व्यक्त केलेली भीती खरी ठरत त्यांचे वैयक्तिक इन्स्टाग्राम खाते हॅक करण्यात आले. तसेच पक्षाचे बॅकअप अकाउंटही हटवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
नव्या अकाउंटलाही चांगला प्रतिसाद (Abhijit Deepke)
दरम्यान, दिपके यांनी त्यांना सोशल मीडियावर धमक्या मिळत असल्याचाही दावा केला आहे. पक्षाचे अधिकृत ‘एक्स’ खाते भारतात ब्लॉक करण्यात आले असून, त्या खात्याला २ लाखांहून अधिक फॉलोअर्स होते. त्यानंतर त्यांनी ‘Cockroach Is Back’ या नावाने नवीन खाते सुरू केले असून, त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
हेही वाचा : NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात आणखी एका ‘मनीषा’ला अटक; योगायोग की वेगळं कनेक्शन?






