मान्सून लांबणीवर; ‘या’ दिवशी होणार महाराष्ट्रात दाखल
Updated On:

पुणे – देशभरातील शेतकरी ज्याची आतुरतेने वाट पाहत असतात तो नैऋत्य मान्सून यंदा नियोजित वेळेपेक्षा चार दिवस उशिराने म्हणजे पाच जून रोजी केरळात दाखल होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. महाराष्ट्रात त्यानंतर 11 जून दरम्यान येईल असा अंदाज आहे.
मान्सून दरवर्षी साधारणत;एक जूनला केरळात दाखल होतो. येत्या रविवारपर्यंत मान्सून अंदमानात दाखल होण्याचे संकेत मिळाले आहेत.





