शपथविधीनंतर खासदार ओमराजेंसाठी पोस्ट करत सांगितलं,’मंगलम योग…’

Omraje Nimbalkar । 18व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाचा आज मंगळवारी दुसरा दिवस आहे. आजही लोकसभेत शपथविधीचा कार्यक्रम सुरू आहे. आज लोकसभेच्या उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी शपथ घेतली. ते सलग दुसऱ्यांदा लोकसभेवर निवडून गेले.
दरम्यान आज मंगळवारी शपथ घेतल्यानंतर त्यांनी आतापर्यंतच्या घडलेल्या योगायोगाची माहिती दिली. ओमराजे यांनी सोशल मीडियावरील एक्सवर पोस्टकरत योगायोग कसा कडून आला याबाबत सांगितले आहे.
मंगलमय योगायोग.
आज आई तुळजाभवानी च्या आशीर्वादाने खासदारकीची शपथ घेतली. फॉर्म भरला मंगळवारी, मतदान पार पडले मंगळवारी, निकाल जाहीर झाला मंगळवारी आणि आज शपथ घेतली ती देखील मंगळवारीच.
हा मंगलमय योगायोग हा धाराशिव च्या मायबाप जनतेसाठी शुभ होईल असे कार्य माझ्याकडुन होऊ दे हीच… pic.twitter.com/mxHcZbSumb
— Omprakash Rajenimbalkar (@OmRajenimbalkr) June 25, 2024
ओमराजे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला तो दिवस, मतदान झाले तो दिवस, निकाल जाहीर झालो तोही दिवस आणि आज खासदार म्हणून शपथ घेतली त्या दिवशीचा वार हा एकच होता याबाबतच त्यांनी माहिती दिली आहे. या सगळ्या घटना, प्रसंग, क्षण मंगळवारीच घडले. आपल्यासाठी हा मंगलमय योग असल्याचे ओमराजे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. आज आई तुळजाभवानी च्या आशीर्वादाने खासदारकीची शपथ घेतली. फॉर्म भरला तो देखील मंगळवारी, मतदान देखील मंगळवारी, निकाल देखील मंगळवारी आणि आज शपथ घेतली तो देखील मंगळवारीच.असे त्यांनी पोळ्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
हा मंगलमय योगायोग धाराशिवच्या मायबाप जनतेसाठी शुभ होईल असे कार्य माझ्याकडून होऊ दे हीच सर्वांचे कुलदैवत आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना. दुसर्यांदा खासदारकी म्हणून शपथ आज घेतली पण जनतेची कामे ही कधीच खंड न पडता निवडणूक झाली त्या दिवसापासून लगेच सुरू केली. पुन्हा एकदा सर्व मायबाप जनतेचे मनापासून आभार, अशा शब्दात ओमराजेयांनी शपथ घेतल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या.




