पिंपरी | ओमराजे निंबाळकरांनी केले महात्मा बसवेश्वरांना अभिवादन
Updated On:

निगडी, (वार्ताहर) – धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी निगडी येथील महात्मा बसवेश्वर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या निमित्ताने महात्मा बसवेश्वर पुतळा समितीच्या वतीने ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांचा कर्नाटकी फेटा, शाल, बसवेश्वर चरित्र ग्रंथ, प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, दत्ता बहिरवाडे, डीआरडीओचे सेवा निवृत्त ज्येष्ठ शास्रज्ञ अशोक नगरकर, सुरेश वाळके, सिध्दरामेश्वर नावदगेरे, चंद्रकांत खोचरे, सुरेश लिंगायत, रघुनाथ नष्टे, राजेंद्र चिकटे, संगमेश्वर शिवपूजे, हनुमंत गुब्याड उपस्थित होते.





