Maharashtra Election : कैलास पाटलांना फडणवीसांनी मंत्रिपदाची ऑफर दिली होती; मात्र.. ओमराजे निंबाळकरांनी केला मोठा गौप्यस्फोट

धाराशिव : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी काही दिवस शिल्लक राहिले आहेत. यादरम्यान अनेक राजकीय घटना घडताना दिसत आहेत. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. अनेक नेते गौप्यस्फोट करताना दिसत आहेत. असाच एक मोठा गौप्यस्फोट ओमराजे निंबाळकर यांनी केला आहे. कैलास पाटील यांच्या प्रचार सभेत ओमराजे निंबाळकरांनी हा मोठा गौप्यस्फोट केला आहे.
काय म्हणाले ओमराजे निंबाळकर?
कैलास पाटील यांनी फक्त पन्नास खोक्यांना लाथ मारली नाही तर मंत्रीपदावर सुद्धा पाणी सोडलं. याचा मी स्वतः साक्षीदार असल्याचा गौप्यस्फोट खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केला. माझ्याच फोनवर देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला. तेव्हा त्यांनी ओमराजे तुमची अडचण आहे, पण कैलास पाटील यांना काय अडचण आहे असा सवाल केला.
तेव्हा मी म्हणलं ते माझ्याबरोबरच आहेत, त्यांना फोन देतो तुम्हीच बोला. फडणवीस यांनी कैलास पाटील यांना पहिल्यांदा राज्यमंत्री पद देतो म्हणाले. आमदार पाटील यांनी स्पष्ट शब्दात त्यास नकार दिला. काही वेळानं पुन्हा फोन केला व फडणवीस यांनी मग कॅबेनेट मंत्री करतो म्हणाले. आमदार कैलास पाटील यांनी आपल्याला मुख्यमंत्री जरी केल तरी आपण तिकडे येणार नसल्याच ठामपणे सांगितलं.





