ओमायक्रॉनची दिल्लीपासून मुंबईपर्यंत दहशत, देशात आतापर्यंत 236 रुग्ण

नवी दिल्ली – देशभरात प्राणघातक करोना विषाणूचा सर्वात धोकादायक प्रकार असलेल्या ओमायक्रॉनची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत. देशात या धोकादायक आणि वेगाने पसरणाऱ्या प्रकाराची 236 प्रकरणे समोर आली आहेत. राजधानी दिल्ली आणि महाराष्ट्रात परिस्थिती सर्वात वाईट आहे. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनवर बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर मुंबईत ३१ डिसेंबरपर्यंत कलम 144 लागू करण्यात आला आहे.
देशभरात एकूण 236 ओमायक्रॉनची प्रकरणे आहेत तर आतापर्यंत 104 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ओमायक्रॉन देशातील 16 राज्यांमध्ये पसरला आहे.
ओमायक्रॉनची लागण झालेल्या राज्यांची आकडेवारी
महाराष्ट्र- 62 रिकव्हरी 35, दिल्ली- 64 रिकव्हरी 23, तेलंगणा- 24 रिकव्हरी 0, राजस्थान – 21 रिकव्हरी 19, कर्नाटक – 19 रिकव्हरी 15, केरळ – 15 रिकव्हरी 0, गुजरात 14 रिकव्हरी 4, J&K 3 रिकव्हरी 3, आंध्र प्रदेश 2 रिकव्हरी 1, ओडिशा 2 रिकव्हरी 0, उत्तर प्रदेश 2 रिकव्हरी 2, चंदीगड 1 रिकव्हरी 0, लडाख १ रिकव्हरी १, तामिळनाडू 1 रिकव्हरी 0, उत्तराखंड 1 रिकव्हरी 0, पश्चिम बंगाल 1 रिकव्हरी 1





