चिंताजनक! ‘ओमायक्रॉन’रुग्णांमध्ये वाढ; 27 दिवस, 21 राज्ये आणि 781 प्रकरणे
Updated On:

नवी दिल्ली – ओमायक्रॉनचा धोका देशात सातत्याने वाढत आहे. करोनाचा हा नवीन प्रकार देशातील 21 राज्यांमध्ये पोहोचला आहे. गेल्या 24 तासात ओमायक्रॉनचे 128 नवीन रुग्ण आढळले आहेत. यानंतर देशातील ओमायक्रॉन रुग्णांची एकूण संख्या 871 वर पोहचली आहे. ओमायक्रॉनचे 241 रुग्ण उपचारानंतर बरेही झाले आहेत. देशाची राजधानी दिल्लीत सर्वाधिक प्रकरणे आहेत, तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे.
दिल्लीत 238, महाराष्ट्रात 167, गुजरातमध्ये 73 आणि केरळमध्ये 65 ओमायक्रॉनची प्रकरणे वाढली आहेत. दरम्यान, करोनाच्या देशव्यापी लसीकरणांतर्गत आतापर्यंत 143.15 कोटी लोकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. देशात सध्या करोनाचे सक्रिय रुग्ण 77 हजार 2 आहेत. सक्रिय प्रकरणे एकूण प्रकरणांपैकी 1% पेक्षा कमी आहेत. सध्या ते 0.22% आहे जे मार्च 2020 नंतरचे सर्वात कमी आहे.





