दिल्लीत करोनाची दहशत सुरू, महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे सहा नवीन रुग्ण, देशात एकूण 153 बाधित

नवी दिल्ली – देशात ओमायक्रॉन बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत एकूण 12 राज्यांमध्ये ओमायक्रॉन पसरला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 54 बाधित आढळले आहेत. त्याच वेळी,राजधानी दिल्लीत 22, तेलंगणात 20, राजस्थानमध्ये 17, कर्नाटकात 14, गुजरातमध्ये 9, केरळमध्ये 11, उत्तर प्रदेशमध्ये दोन, आंध्र प्रदेश, चंदीगड, तामिळनाडू आणि प. बंगालला ओमायक्रॉनचे रुग्ण सापडले आहेत. देशातील ओमायक्रॉन रुग्णांची एकूण संख्या आता 153 वर गेली आहे.
याआधी, रविवारी राजधानी दिल्लीत करोनाचे 107 प्रकरणे नोंदवण्यात आली होती, जी सहा महिन्यांनंतर एका दिवसातील सर्वाधिक करोना रुग्णांची नोंद दिल्लीत झाली आहे. दिल्लीमध्ये ओमायक्रॉनच्या रुग्णांत वाढ होत असल्याकारणाने चिंता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रातही करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, रविवारी येथे 902 रुग्ण आढळले.





