ओमर अब्दुल्ला यांनी केले पंतप्रधान मोदींचे तोंडभरुन कौतुक ; वाचा काय-काय म्हणाले ?

Omar Abdullah on Prime Minister । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोनमर्ग बोगद्याचे उद्घाटन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू आणि काश्मीरमधील गंदरबल याठिकाणी झेड-मोर बोगद्याचे उद्घाटन केले. या कार्यक्रमादरम्यान, जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, उपराज्यपाल मनोज सिन्हा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील उपस्थित होते.
सोनमर्ग बोगद्याच्या उद्घाटन समारंभात मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पंतप्रधानांचे तोंडभरून कोतुक केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी बोलताना अब्दुल्ला यांनी, “१० ऑक्टोबर रोजी या बोगद्याच्या प्रकल्पावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सात जणांना मी श्रद्धांजली वाहतो. जर मी त्यांना श्रद्धांजली न देता माझे भाषण सुरू केले तर ते अन्याय होईल. दुर्दैवाने गेल्या ३५-३७ वर्षांत, येथील हजारो लोकांनी या देशाच्या प्रगतीसाठी, जम्मू आणि काश्मीरच्या विकासासाठी आपले प्राण दिले आहेत.” असे त्यांनी आपल्या भाषांच्या सुरुवातीला म्हटले.
ओमर अब्दुल्लाकडून पंतप्रधान मोदींचे कौतुक Omar Abdullah on Prime Minister ।
पंतप्रधान मोदींचे कौतुक करताना ते पुढे म्हणाले, “आम्ही देशाचा सौदा करण्यास तयार नव्हतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येथे उपस्थिती ही या वस्तुस्थितीची साक्ष आहे की ज्यांना या देशाचे भले नको आहे ते कधीही यशस्वी होणार नाहीत.” त्यांना आम्ही नेहमीच पराभूत करून परत पाठवू. आज जम्मू आणि काश्मीरच्या लोकांना समाधान आहे की या बोगद्याचे उद्घाटन तुमच्या हस्ते झाले.”असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “पंतप्रधान साहेब, या बोगद्याच्या उद्घाटन समारंभाला तुमची आजची उपस्थिती या गोष्टीचा पुरावा आहे की जे हे हल्ले करतात, ज्यांना या देशाचे कल्याण नको आहे, ज्यांना देशात शांतता आणि सुरक्षितता हवी आहे जम्मू आणि काश्मीर सरकारच्या प्रयत्नांच्या विरोधात आहेत. ज्यांना प्रगती पहायची नाही ते कधीही यशस्वी होऊ शकत नाहीत. त्यांना येथे नेहमीच पराभवाला सामोरे जावे लागेल. आम्ही त्यांना नेहमीच पराभूत करू आणि येथून परत पाठवू.”
तुम्ही तुमचे तिसरे वचन पूर्ण कराल Omar Abdullah on Prime Minister ।
अब्दुल्ला म्हणाले, “लोक या बोगद्याची आतुरतेने वाट पाहत होते. वर्षाचे सर्व १२ महिने येथे पर्यटन असेल. तुम्ही तीन महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या होत्या, तुम्ही दिल आणि दिल्लीचे अंतर कमी करण्यात गुंतलेले आहात. १५ दिवसांत तुम्ही जम्मू आणि काश्मीरला दोन प्रकल्प दिले. अशा निर्णयांमुळे केवळ हृदयांचे अंतर कमी होत नाही तर दिल्लीचे अंतरही कमी होते.” असे म्हणत त्यांनी पंतप्रधानांवर कौतुकाचा वर्षाव केला.
मुख्यमंत्री म्हणाले, “तुम्ही जम्मू आणि काश्मीरमध्ये निवडणुका घेतल्या, ज्यामध्ये लोकांनी उत्साहाने भाग घेतला. कुठेही धांदल झाली नाही, याचे श्रेय तुम्हाला आणि निवडणूक आयोगाला जाते. आम्हाला आशा आहे की तुम्ही तुमचे तिसरे वचन पूर्ण कराल आणि जम्मू काश्मीर पुन्हा एक राज्य बनेल.”





