Paris Olympics 2024 : चीनने ऑलिम्पिकमध्ये जिंकले पहिले सुवर्ण, नेमबाजीत (10m Air Riffle Mixed Team event) केली कमाल….

Paris Olympics 2024 (10M Air Rifle Mixed Team) : ऑलिम्पिक 2024 मध्ये चीनने पहिले सुवर्णपदक जिंकले आहे तर कोरियाने रौप्यपदक पटकावले आहे. 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेत नेमबाजीत त्यांनी हे पदक जिंकले आहे. चीन (हुआंग युटिंग आणि शेंग लिहाई) आणि कोरिया (केयूम जिह्योन आणि पार्क हाजुन ) यांच्यात अंतिम सामना झाला. यामध्ये चीनने बाजी मारत अव्वल तर कोरियानं दुसरे स्थान पटकावले.
चीननं कोरिया प्रजासत्ताकचा 16-12 असा पराभव केला. कझाकिस्तानने (एलेक्जेंड्रा ले आणि इस्लान सतपायेव) तीसरे स्थान मिळवत 2024 च्या ऑलिम्पिकमध्ये पहिले पदक म्हणजेच कांस्पयपद जिंकले आहे. स्पर्धेत जर्मनीचा संघ (अन्ना जानसेन आणि मैक्सिमिलियन उलब्रिच) चौथ्या स्थानावर राहिला. या स्पर्धेत एकूण 28 संघांनी सहभाग घेतला होता.
First gold medal of the #Paris2024 Games 🥇
China takes the Gold in the 10m Air Riffle Mixed Team event. To be honest, we’re a bit emotional 🥹
–
Première médaille d’or des Jeux de Paris 2024 🥇
La Chine remporte l’or dans l’épreuve de tir à la carabine à air comprimé 10m par… pic.twitter.com/UhGrCGBeVh— Paris 2024 (@Paris2024) July 27, 2024
भारताच्या हाती निराशा….
याच स्पर्धेत म्हणजेत 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक पात्रता फेरीत भारताला निराशेचा सामना करावा लागला. या स्पर्धेत सहभागी झालेले दोन्ही भारतीय संघ पदकाच्या शर्यतीतून बाहेर झाले आहेत. अर्जुन बबुता आणि रमिता जिंदाल ही भारतीय जोडी सातव्या स्थानावर तर इलावेनिल आणि संदीपची जोडी 12व्या स्थानावर राहिली. पदकासाठीच्या फेरीत जाण्यासाठी टॉप 4 मध्ये स्थान मिळवावे लागले, जे त्यांना प्राप्त करता आले नाही.





